Mount Everest : पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

Mount Everest : पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

Mount Everest : पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी ८ हजार मीटर उंची असलेले जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माऊण्ट एव्हरेस्टला गवसणी घातली. महाराष्ट्र पोलिस खात्यातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे ते पहिलेच मराठी अधिकारी ठरले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे कौतुक केले आहे. उत्तुंग कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलिस बलातील पहिले मराठी अधिकारी ठरल्याबद्दल गुरव यांचा सार्थ अभिमान आहे अशा शब्दात गृहमंत्र्यांनी गुरव यांचे अभिनंदन केले. म्हणाले. तसेच सांगलीचे सुपुत्र संभाजी गुरव यांनी २३ मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले. एक धाडसी अधिकारी म्हणून पोलीस खात्यामध्ये त्यांची ओळख आहे. त्यांनी यशाची अशीच शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा गृहमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

एव्हरेस्ट सर करण्यासाठी संभाजी गुरव गेल्या दोन वर्षे मेहनत घेत होते. दरम्यान ६ एप्रिल २०२१ रोजी ते मुंबईतून रवाना झाले. यानंतर नेपाळमधील पायोनियर अॅडव्हेंचर्स गिर्यारोहक कंपनीकडून गुरव यांनी सहा जणांच्या पथकासह एव्हरेस्टवर १८ मे रोजी चढाई सुरू केली. किलीमांजरी शिखर सर केल्यानंतर गुरव यांच्या पथकाने प्रत्यक्षात एव्हरेस्टवर चढाई सुरू केली. त्यानंतर २१ मे रोजी त्यांनी अंतिम चढाईसाठी सुरुवात केली. अखेर त्यांना तिसऱ्या प्रयत्नात माऊण्ट एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यश आले. एव्हरेस्ट शिखरावर २३ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज रोवला. गुरव गेल्या १५ वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहेत. याआधी सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा आणि औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफिक शेक यांनी एव्हरेस्ट सर केले होते. पण शर्मा हे पंजाबी अधिकारी होते तर शेख हे पोलीस कर्मचारी होते. त्यामुळे एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले मराठी पोलिस अधिकारी ठरले आहेत.

एव्हरेस्ट सर करणाऱ्या संभाजी गुरव यांचे कामगिरीमुळे सांगलीतील वाळवा तालुक्यातील पडवळीवाडी गावात आनंद व्यक्त केला जात आहे. संभाजी गुरव यांनी एव्हरेस्टवर चढाई करून देशाची मान उंचावली असली तरी याआधीही अनेक पराक्रम त्यांचे नावे आहेत. संभाजी गुरव गेल्या १५ वर्षांपासून पोलीस दलात आहेत. ते सध्या पनवेलमध्ये पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. एक धाडसी अधिकारी म्हणून पोलीस खात्यामध्ये त्यांच्याकडे पाहिले जाते. गुवर यांनी गडचिरोलीत असताना केलेल्या कामगिरीसाठी त्यांना २०१४ मध्ये राष्ट्रपती पदक, २०१५ मध्ये विशेष सेवा पदक, २०१८ मध्ये अंतरिक सेवा पदक आणि महासंचालकांचे विशेष पदक मिळाले आहे.


 

First Published on: May 25, 2021 2:07 PM
Exit mobile version