भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे करोनाला रोखण्यात यश

भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे करोनाला रोखण्यात यश

इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक आहे. तरीही संसर्ग आटोक्यात, मृत्यूदरही कमी, जे नुकसान झाले त्याचे दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो, त्याबद्दल जनतेचे आभार. कारण हा लढा जननेतृत्वात सुरू आहे. हा लढा प्रदीर्घ काळ चालणारा आहे. भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे करोनाला रोखण्यात यश आले आहे. देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद असल्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

करोनाच्या लसीवर देशात जे काम सुरू आहे, त्याकडे जगाच्या नजरा आणि आपल्या आशा आहेत, या संकटाचा अनुभवही नाही आणि इलाजही, त्यामुळे हा लढा दीर्घकालीन असेल, प्रत्येक वर्गाला करोनाचा फटका बसला, मात्र गरीब सर्वाधिक पिचले गेले. श्रमिक आणि इतर ट्रेन सुरू झाल्या आहेत, सावधानता बाळगून हवाई सेवा सुरू झाली, उद्योगही सुरू झाले म्हणजेच अर्थव्यवस्थेचा मोठा भाग खुला झाला, अशात आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी, असेही मोदी म्हणाले.

First Published on: June 1, 2020 3:47 AM
Exit mobile version