CoronaVirus: सुप्रीम कोर्टाचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; दोन जण क्वारंटाईन

CoronaVirus: सुप्रीम कोर्टाचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; दोन जण क्वारंटाईन

जगभरात परसलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही धुमाकूळ घातला आहे. आता तर सुप्रीम कोर्टापर्यंत कोरोना जाऊन पोहोचला आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे दोन रजिस्ट्रारला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात दोन वेळा आला होता. त्यावेळी कोर्टातील सर्व अधिकारी कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा करत होते.

हेही वाचा – …आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला रडू कोसळले

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजारांच्या पार गेला आहे. आतापर्यंत ९२६ लोकांचा यामुळे मृत्यू झाला असून ६ हजार ९७६ लोक कोरोना मुक्त झाले आहेत. ही माहिती सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘कोविड -१९ रूग्णांविषयी संभ्रम आहे. बरे झालेल्या रूग्णांमधून संसर्ग होण्याचा धोका नाही, उलट त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा वापरुन इतरांना बरे करता येते. त्यामुळे देशात विविध राज्यांमध्ये प्लाझ्मा थेरेपीचे प्रयोग केले जात आहेत.

First Published on: April 27, 2020 10:05 PM
Exit mobile version