Republic Day: सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना आले रेकॉर्डेड कॉल्स; २६ जानेवारीला दिल्लीमध्ये काश्मीरचा झेंडा फडकवण्याची धमकी

Republic Day: सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना आले रेकॉर्डेड कॉल्स; २६ जानेवारीला दिल्लीमध्ये काश्मीरचा झेंडा फडकवण्याची धमकी

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशिक्षणार्थी वकिलांना धमकीचे रेकॉर्डेड कॉल्स येण्याचे सत्र सुरुच आहे. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना निनावी नंबरवरून रेकॉर्डेड कॉल्स मिळाले आहेत. यावेळेस कॉल्सच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला दिल्लीत काश्मीरचा झेंडा फडकवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या रेकॉर्डेड कॉल्समुळे खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकिलांना आलेल्या रेकॉर्डेड कॉल्समधील व्यक्तीने स्वतःला इंडियन मुजाहिद्दीनचा सदस असल्याचा दावा केला आहे. तसेच काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तितकेच जबाबदार आहे, जितके पंतप्रधान मोदींचे सरकार आहे.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या जवळपास ३५ वकिलांना खलिस्तान समर्थकांकडून धमकी देण्यात आली होती. शीख फॉर जस्टिसकडून इंग्लंडच्या नंबरवरून आलेल्या ऑटोमॅटेड फोन कॉलच्या माध्यमातून वकिलांना धमकी देण्यात आली होती. कॉलच्या ऑडिओ रिकॉर्डिंगतून खुलासा झाला आहे की, ‘कॉल करणारा म्हणाला की, शेतकरी आणि पंजाबच्या शीखांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू नये. शीख दंगली आणि हत्याकांडात एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही हे तुमच्या आठवणीत राहिले पाहिजे.’

दरम्यान काही दिवसांपूर्वी शीख फॉर जस्टिस (एसएफजे) संघटनेशीसंबंधित असलेल्या काही ट्वीट हँडलवरून २६ जानेवारीला इंडिया गेट आणि लाल किल्ल्यावर नाकाबंदी करण्याबाबत ट्वीट केले गेले होते. तसेच भारतीय संविधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नाकाबंदी आयोजन करण्यासाठी १० लाख डॉलरची घोषणा केली होती.


हेही वाचा – कडाक्याची थंडी अन् चहूबाजूंनी बर्फ ; BSF जवानाने केलं असं काही की, म्हणाल ‘How is the Josh’


 

First Published on: January 24, 2022 3:32 PM
Exit mobile version