घरट्रेंडिंगकडाक्याची थंडी अन् चहूबाजूंनी बर्फ ; BSF जवानाने केलं असं काही की,...

कडाक्याची थंडी अन् चहूबाजूंनी बर्फ ; BSF जवानाने केलं असं काही की, म्हणाल ‘How is the Josh’

Subscribe

कडाक्याची थंडी,ऊन,वारा आणि पाऊस या नैसर्गिक आपत्ती आणि बदलांना सामोरे जात आणि जोखीम पत्करत आपलं काम चोख करत असतात. परिस्थिती कीतीही कठीण असली तरीही देशाचे रक्षण करण्यात हे भारतीय सैनिक तसूभरही कमतरता भासू देत नाहीत. दरम्यान, बर्फाळ प्रदेशातील एका सीमा रक्षक बल (BSF) च्या जवानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

परिस्थिती कशीही असो, सीमेवरील जवान हे हालाखीच्या परिस्थितीही देशाचे संरक्षण करत असतात. कडाक्याची थंडी,ऊन,वारा आणि पाऊस या नैसर्गिक आपत्ती आणि बदलांना सामोरे जात, जोखीम पत्करत आपलं काम चोख करत असतात. परिस्थिती कीतीही कठीण असली तरीही देशाचे रक्षण करण्यात हे भारतीय सैनिक तसूभरही कमतरता भासू देत नाहीत. दरम्यान, बर्फाळ प्रदेशातील एका सीमा रक्षक बल (BSF) च्या जवानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओने लोकांना अचंबित केले आहे. हा जवानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, जवानाचा हा व्हिडीओ ‘BSF’ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये ‘BSF’ जवान एका बर्फाळ भागात व्यायाम करताना पाहायला मिळत आहे. या कठीण परिस्थितीत म्हणजेच आपण या कडाक्याच्या थंडीत अशाप्रकारे व्यायाम करण्याचा विचारही करु शकत नाही. मात्र या जवानाची थंडीतली कसरत पाहून भारतीयांना चकित केले आहे.

चक्क 40 सेकंदात 47 पुशअप

या जवानाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये कडाक्याची थंडीत सुरक्षा सीमा दलाचा जवान पुश अप करताना दिसत आहे. जवानाने चक्क 40 सेकंदात 47 पुश अप मारले आहेत.त्यामुळे व्हिडिओ पाहणारे अवाक झालेत. BSF ने व्हिडिओ शेअर करत, ’40 सेकंदात 47 पुशअप ! Fit India Challenge’, अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.या व्हिडिओला 31 हजारपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. या जवानाचे भारतीयांकडून कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – R-Day Parade Guidelines: लस न घेतलेल्यांना आणि १५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना परेडसाठी नो एंट्री; प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन गाईडलाईन्स जारी


 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -