राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याबद्दलची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याबद्दलची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दलची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने याचिकाकर्त्यालाही फटकारत तुम्ही कोण आहात? असा प्रश्न विचारला. तसेच कोर्टाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

केरळमधील रहिवासी असलेल्या आभा मुरलीधरन यांनी राहुल गांधींच्या प्रकरणाचा मुद्दा मांडत, ही याचिका दाखल केली होती. त्यांनी लोकप्रतिनिधी कायदा, 1951च्या कलम 8(3) च्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले होते. त्यावर कोर्टाने कठोर भूमिका घेत तुम्ही कोण आहात? तुमचे सदस्यत्व रद्द झाले आहे का?, असे प्रश्न याचिकाकर्त्याला विचारले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

सुरत न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे, राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती हेमंत या प्रकरणाचा निकाल देणार आहेत.

भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. सुरत न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांना आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.


हेही वाचा : Army Chopper Crashed: जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; एका जवानाला


 

First Published on: May 4, 2023 2:47 PM
Exit mobile version