घरदेश-विदेशArmy Chopper Crashed: जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; एका जवानाला वीरमरण

Army Chopper Crashed: जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; एका जवानाला वीरमरण

Subscribe

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू काश्मीरच्या किश्तवर जिल्ह्यातील मारवाह तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टर दुर्घनटाग्रस्त झालं तेव्हा त्यामध्ये एकूण तीनजण होते. या दुर्घटनेनंतर पायलट आणि सह-पायलट यांना बाहेर काढण्यात आलं आहे. ते गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू काश्मीरच्या किश्तवर जिल्ह्यातील मारवाह तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टर दुर्घनटाग्रस्त झालं तेव्हा त्यामध्ये एकूण तीनजण होते. या दुर्घटनेनंतर पायलट आणि सह-पायलट यांना बाहेर काढण्यात आलं आहे. ते गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.( Army Chopper Crashed Army chopper crashed in Jammu Kashmir Heroic death of a soldier )

किश्तवाडमधील मारवाह नदीजवळ लष्कराचं एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेत एका जवानाला वीरमरण आलं आहे तर दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. खराब हवामानामुळे या भागातील संपर्क यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही.

- Advertisement -

या दुर्घटनेनंतर पोलीस आणि लष्कराचे पथक दुसऱ्या हेलिकॉप्टरने दुर्घटना घडलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टरचा सांगडा चिनाब नदीत बुडाला आहे. जखमी झालेल्या पायलटना हेलिकॉप्टल लँड झालेल्या ठिकाणापर्यंत उचलून न्याव लागलं. जखमी पायलटना उपाचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

( हेही वाचा: Wrestlers Protest : जंतरमंतरवरील धक्काबुक्कीनंतर काँग्रेस कुस्तीपटूंच्या पाठीशी )

- Advertisement -

याआधीही घडल्यात अशा घटना

यापूर्वी मार्चमध्ये दोन वेळा अशी दुर्घटना घडली होती. 8 मार्चला भारतीय नौदलाचं ध्रुव हेलिकॉप्टरला समुद्र किनाऱ्यावर अपघात झाला होता. नौदलाचे अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) मुंबईहून नियमित उड्डाणासाठी जात असताना या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं होतं.

तसचं, 16 मार्चला भारतीय सेनेचं चीता हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलं होतं. मंडळा हिल्सजवळ ही घटला घडली होती. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलटांना वीरमरण आलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -