सुशांत सिंहच्या आत्महत्येवरुन चिराग पासवान यांचा उद्धव ठाकरेंना फोन

सुशांत सिंहच्या आत्महत्येवरुन चिराग पासवान यांचा उद्धव ठाकरेंना फोन

सुशांत सिंह आणि चिराग पासवान

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचे आत्महत्येचे कारण अद्याप पुर्णतः स्पष्ट झाले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे चिरंजीव लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणाची चर्चा केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील गटबाजीबद्दल बिहारमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला.


चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही पत्र लिहून सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंशी बोलावे, असे म्हटले होते. त्यानंतर चिराग यांनी स्वत: फोन करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला.

दरम्यान, “सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्याप्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. कुणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा होईल”, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी चिराग पासवान यांना दिला आहे.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंग राजपूत याने १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुरुवातीला वांद्रे पोलीस तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.


हेही वाचा – Video : सुशांतने सांगितले होते, लग्नासाठी मुलगी बघायला; ‘त्या’ मुलीवर झाली होती चर्चा


 

First Published on: June 22, 2020 8:38 PM
Exit mobile version