घरमनोरंजनVideo : सुशांतने सांगितले होते, लग्नासाठी मुलगी बघायला; 'त्या' मुलीवर झाली होती...

Video : सुशांतने सांगितले होते, लग्नासाठी मुलगी बघायला; ‘त्या’ मुलीवर झाली होती चर्चा

Subscribe

व्हिडिओमध्ये चाहते सुशांत सिंह राजपूतच्या साधेपणाविषयी त्याचे कौतुक करत अनेक कमेंट्स करत आहेत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या अभिनय शैली आणि कामाने लोकांच्या हृदयात चांगले स्थान निर्माण केले आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी अभिनेत्याने जगाला निरोप दिला. त्याच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीलाही धक्का बसला आहे. याशिवाय सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका महिलेशी बोलताना दिसतोय. व्हिडिओमध्ये ती महिला त्याला विचारते की, तूझ्या लग्नाला सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणार ना! याप्रश्नावर या अभिनेत्याने भन्नाट उत्तर दिले.

सुशांत सिंह राजपूतचा हा व्हिडिओ त्यांच्या पाटण्यातील घराचा व्हिडिओ असल्याचे दिसतेय. या व्हिडिओमध्ये महिलेने सुशांतला असे विचारले की, तूझ्या लग्नाला सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणार ना! यावेळी अभिनेता म्हणाला, “तुम्ही आधी मुलगी शोधा…” यानंतर, त्या महिलेने अभिनेत्याला गावाकडची मुलगी चालेल का?, असे विचारल्यावर अभिनेताने उत्तर दिले, ” का नाही!” व्हिडिओमध्ये चाहते सुशांत सिंह राजपूतच्या साधेपणाविषयी त्याचे कौतुक करत अनेक कमेंट्स करत आहेत. सुशांतचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ आतापर्यंत जास्त ३ लाख वेळा पाहिला गेला आहे.

- Advertisement -

बघा व्हिडिओ

सुशांत सिंह राजपूतने ‘किस देश में है मेरा दिल’ या टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. यानंतर सुशांत सिंह राजपूतने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली, यासाठी त्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. यानंतर जरा नचके दिखा आणि झलक दिखला जा सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याचे खूप कौतुक करण्यात आले ‘काय पो चे’ या चित्रपटाने या अभिनेत्याने चित्रपट विश्वात प्रवेश केला. यानंतर तो शुद्ध देसी रोमांस, एमएस धोनी, सोन चिरैया आणि बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसला.


आता सुशांतवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता करणार निर्मीती!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -