देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा; राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा; राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

EVM Tampering in UP : ईव्हीएम छेडछाड अशक्य, मुख्य निवडणूकआयुक्तांची EVM चोरीवर प्रतिक्रिया

भारताचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे होणार असून सध्या ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत आहेत. सुशील चंद्रा यांनी आजपासून या पदाचा पदभार स्वीकारला. सुशील चंद्रा यांनी सुनिल अरोरा यांची जागा घेतली असून सुनिल अरोरा यांचा कार्यकाल सोमवारी संपला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा यांची नियुक्ती केली. आजपासून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह चंद्रा हे निवडणूक आयोगाचे कामकाज पाहणार आहेत

अशी झाली नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त असतात. सुशील चंद्रा यांनी २०१४ साली निवडणूक आयुक्तीची जबाबदारी घेतली होती. निवडणूक आयोगातील सर्वात वरिष्ठ आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात येते. त्याच आधारावर सुशील चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड झाली आहे.

सुशील चंद्रा यांच्या नावावरही सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रा यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयुक्त करण्यात आले होते. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरो त्याच दिवशी सेवानिवृत्त होत असल्याने ते १३ एप्रिल रोजी पदभार स्वीकारतील. सुशील चंद्रा हे १४ मे २०२२ पर्यंत या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. निवडणूक आयोगात येण्यापूर्वी ते केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष होते. यासह सुशील चंद्रा हे १९८० च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील अनेक महत्वाच्या पदांवर देखील त्यांनी काम केले आहे.

पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या निवडणुकांची जबाबदारी सुशील चंद्रा यांच्यावर असणार आहे. नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वात वरील राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी मार्चमध्ये होणार आहेत. उत्तरप्रदेश वगळता उर्वरित विधानसभा निवडणुकांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपणार आहे तर उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे रोजी संपणार आहे.

First Published on: April 13, 2021 4:27 PM
Exit mobile version