लोकसभा २०१९ लढवणार नाही – सुषमा स्वराज

लोकसभा २०१९ लढवणार नाही – सुषमा स्वराज

सुषमा स्वराज

परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. इंदूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. तसेच या निर्णयाची माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिल्याचेही सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितले. इंदूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. तसेच या निर्णयाची माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिल्याचेही सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितले. देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदावर असलेल्या सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातील खासदार आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे आपण लोकसभा २०१९ ची निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा यापूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर आज स्वतः सुषमा स्वराज यांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे.

मध्य प्रदेशच्या प्रचारसभेसाठी दाखल

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी सुषमा स्वराज मंगळवार, २० नोव्हेंबरला इंदूरमध्ये आल्या होत्या. ‘आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही,’ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच निवडणूक न लढण्याचा माझा विचार आहे. पण त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: November 20, 2018 3:15 PM
Exit mobile version