8 वर्षाची चिमुरडी बनली ‘स्विडनची राणी’

स्विडनच्या तलावात मिळालेली प्राचीन तलवार आणि ते शोधणारी छोटीशी सागा (सौ.-TheLocal)

ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंना जगात खूप मोठी किंमत अाहे. जगात अनेक ठिकाणी अशा प्राचीन तसंच दुर्मिळ वस्तूंची वस्तुसंग्रहालयं आहेत, जिथे पर्यटक आवर्जून भेट देतात. काही दिवसांपूर्वी स्विडनमध्ये अशीच एक प्राचीन वस्तू सापडली आहे. ही एक १५०० वर्ष जुनी राजघराण्यातील तलवार असून, ती सापडण्यामागेसुद्धा एक किस्सा आहे. सागा नेव्हेक या ८ वर्षाच्या चिमुरडीने ही प्राचीन राजघराण्यातील तलवार शोधून काढली आहे. सागाने एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ती स्विडनच्या साउदर्न तलावामध्ये आपल्या घरच्यांसोबत पोहण्यासाठी गेली होती. पोहतेवेळी तिच्या हाताला काहीतरी वस्तू लागली. सुरुवातील ही वस्तू एखादी काठी असेल असं सागाला वाटलं. मात्र, तिने पुन्हा त्या काठीला हात लावल्यानंतर तिच्या हाताला तलवारीची मूठ जाणवली. सागाला याबाबत संशय येताच ती जोरात ओरडली, ‘बाबा मला एक तलवार मिळाली आहे.’


Video: जेव्हा घोडा अचानक ‘बार’मध्ये घुसतो

त्यानंतर या मुलीने तिच्या वडिलांच्या साहाय्याने ती तलवार पाण्यातून बाहेर काढली. ही तलवार पाहताच ती खूप प्राचीन आणि एखाद्या राजघराण्यातील असल्याचा अंदाज सागाच्या परिवाराला आला. त्यानंतर लगेचच ही तलवार घेऊन ते संबंधित तज्ञ व्यक्तींकडे पोहचले. तज्ञांच्या एका टीमने बऱ्याच तपासण्या केल्यानंतर तसंच काही गोष्टींची पडताळणी केल्यानंतर ती तलवार प्राचीन राजघराण्यातील असल्याचा निष्कर्ष काढला. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ही तलवार स्वीडनच्या एका राजघराण्यातील राणीची असून ती जवळपास १५०० वर्ष जुनी आहे. दरम्यान ही ऐतिहासिक तलवार शोधणाऱ्या सागा नेव्हेकचा उल्लेख काही स्थानिक वृत्तपत्रांनी ‘हीच स्वीडनची खरी राणी’ असा केला आहे. सागाने शोधलेली ही तलवार एका स्थानिक म्युझिअममध्ये ठेवण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे.


वाचा: तांदळाच्या वेफर्सपासून बनवली ‘मोनालिसा’

First Published on: October 6, 2018 5:06 PM
Exit mobile version