Zomato, Swiggy Down: भारतात झोमॅटो, स्विगी डाऊन, युजर्सचा संताप

Zomato, Swiggy Down: भारतात झोमॅटो, स्विगी डाऊन, युजर्सचा संताप

लोकप्रिय फुड डिलिव्हरींग एप झोमॅटो आणि स्विगीच्या सेवेत देशव्यापी आऊटेजची समस्या उद्भवल्याचे समोर आले आहे. या दोन्ही सेवा जवळपास अर्ध्या तासासाठी डाऊन झाल्याचे युजर्सनेच अनेक पोस्टच्या माध्यमातून जाहीर केले आहे. पण अर्धा तास डाऊन झाल्यानंतर या दोन्ही सेवा पूर्ववत झाल्याचे समोर आले आहे. अनेक युजर्सने दोन्ही सेवांच्या बाबतीत सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. अनेक युजर्सना मेन्यू तसेच लिस्टिंगची सुविधा पाहता येत नसल्याची तक्रार युजर्सने केली होती. ही तात्पुरत्या स्वरूपाची तांत्रिक अडचण असून आम्ही ती सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असा प्रतिसाद कंपनीकडून सोशल मिडियावर देण्यात आला.

भारतातील ऑनलाईन फुड डिलिव्हरी मार्केटमध्ये स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांचा मोठा ग्राहकवर्ग आहे. देशातील कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने दोन्ही कंपन्यांच्या एप्लिकेशनच्या बाबतीत चौकशीचे आदेश दिले होते. दोन्ही कंपन्यांच्या सेवांच्या बाबतीत त्यांच्याकडून न्यूट्रल पद्धतीने सेवा दिली जात आहे का ? याची पडताळणी केली जात असल्याचे सीसीआयने म्हटले आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने सीसीआयकडे चौकशीची मागणी करत काही ठराविक कंत्राटामध्ये प्राधान्याने सेवा दिली जात असल्याचा आरोप केला होता.

युजर्सने दोन्ही सेवा एकाचवेळी बंद झाल्यामुळेही सवाल केला आहे. एकाचवेळी दोन्ही सेवा कशा काय बंद होऊ शकतात ? असा प्रश्न एका ट्विटर युजरने ट्विट करत केला आहे. एका युजरने सेवा डाऊन होण्याचा प्रकार हा गेल्या दोन दिवसांपासून होत असल्याचा दावा केला आहे. या प्रश्नावर झोमॅटो केअरने उत्तर देत आम्ही तांत्रिक अडचणीचा सामना करत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आमची टीम ही तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले आहे. लवकरच आमची सेवा पुन्हा सुरू होईल, असेही झोमॅटोच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.


 

 

First Published on: April 6, 2022 4:01 PM
Exit mobile version