…तोपर्यंत तबलिगींना भारत सोडता येणार नाही!

…तोपर्यंत तबलिगींना भारत सोडता येणार नाही!

आता २६०० पेक्षा जास्त तबलिगींना भारत देश सोडून त्यांच्या देशात जाता येणार नाहीये. हे तबलिगी मरकज मध्ये सहभागी झाले होते. भारतातील ज्या राज्यात तबलिगींविरोधात खटले सुरु आहेत ते संपेपर्यंत त्यांना भारत सोडता येणार नाही.  सरकारने त्यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं आहे

काय आहे प्रतिज्ञापत्रात

कोरोना काळात भारत सरकारने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे तबलिगी नागरिकांवर आहेत. तबलिंगीविरोधात विविध राज्यांमध्ये हे गुन्हे दाखल आहेत. त्यांची सुनावणी होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणांची सुनावणी होईपर्यंत विदेशातून जे तबलिगी भारतात आले आहेत त्यांना आपला देश सोडता येणार नाही. केंद्र सरकारने तबलिगी जमातच्या हजारो जणांना काळ्या यादीत टाकलं असून त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. आत्तापर्यंत २६७९ तबलिगींचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. २७६५ जणांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. २०५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९०५ फरारी तबलिगींविरोधात लुक आऊट नोटीसही लागू करण्यात आली आहे.

दरम्यान तबलिगी समाजाने सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत त्यावरची सुनावणी १० जुलै ला होणार आहे.


हे ही वाचा – किम जोंगचा सनकीपणा, पत्नीचा अपमान झाल्याने ऑफिसच उडवले!


 

First Published on: July 2, 2020 7:53 PM
Exit mobile version