घरताज्या घडामोडीकिम जोंगचा सनकीपणा, पत्नीचा अपमान झाल्याने ऑफिसच उडवले!

किम जोंगचा सनकीपणा, पत्नीचा अपमान झाल्याने ऑफिसच उडवले!

Subscribe

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव वाढले आहेत. त्यामुळेच या दोघांमध्ये युद्ध छेडले जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती.

उत्तर कोरियाने सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते उडवून दिलं आहे. या मागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी, किम यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत केल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव वाढले आहेत. त्यामुळेच या दोघांमध्ये युद्ध छेडले जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती.

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण कोरियाच्या हद्दीतून उत्तर कोरियाविरोधात संदेश देणारे फुगे व पत्रके सोडण्यात येत होती. फुगे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी किम जोंग यांची बहीण किम यो जोंगने दक्षिण कोरियाकडे केली होती. मात्र, दक्षिण कोरियाने याकडे दुर्लक्ष केले.

- Advertisement -

त्यानंतर किम यो यांनी दक्षिण कोरियाविरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली होती. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आणि राष्ट्राध्यक्ष किम जोंग आणि त्यांची बहीण किम यो यांनी संताप व्यक्त केला होता.

पत्नीवर अक्षेपार्ह टिपणी

दक्षिण कोरियातून येणाऱ्या किमविरोधी पत्रकात किम यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीतही करण्यात आले होते. त्यामुळे किम जोंग यांनी दक्षिण कोरियाकडे या बंडखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. उत्तर कोरियात सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवर, पत्रकांमध्ये किम यांची पत्नी री सोल जू यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा आणि छायाचित्राचा वापर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

जाणीवपूर्वक मोहिम

दक्षिण कोरियाने ही मोहिम जाणीवपूर्वक केल्याचा आरोप उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. किम यांच्याविरोधात वातावरण तयार करणे आणि लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे रशियन राजदूत अलेक्झांडर मात्सगोरा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.


हे ही वाचा – तुम्ही डॉक्टर किंवा नर्स आहात? तर ‘ही’ आहे तुमच्यासाठी खास खुशखबर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -