Video : मला बाहेर काढा, आयुष्यभर तुमची गुलामी करेन… भूकंपात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलीची याचना

Video : मला बाहेर काढा, आयुष्यभर तुमची गुलामी करेन… भूकंपात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलीची याचना

तुर्कस्तान आणि सीरियात सोमवारी झालेल्या महाशक्तीशाली भूकंपातील मृतांची संख्या 7800 च्या पार गेली आहे. भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून अद्याप अनेक मृतदेह काढले जात आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये मृतांचा आकडा 6000 हजारांपर्यंत गेला आहे, तर 34, 810 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अशातच काही फोटो समोर येत आहेत जे पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. उत्तर सीरियामध्ये भूकंपाच्या 36 तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भावंडांना जिवंत बाहेर काढण्यात आलं.

या मुलांचे घर इदलिब क्षेत्रात असून या ठिकाणी आत्तापर्यंत 1220 लोकांचा मृ्त्यू झाला आहे. तसेच शेकडो इमारती उध्वस्त झाल्या आहेत.

तुर्कस्तान, सीरियासह ज्या भागात भूकंप झाला तिथे सर्वत्र केवळ कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा आणि आजूबाजूला मृतदेह दिसत आहेत. अनेक लोक त्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांचा शोध घेत आहेत. चारी बाजूंनी केवळ लोकांचा आक्रोश, यातना दिसत आहेत. ढिगाऱ्यातून सतत मृतदेह बाहेर काढले जात आहेत त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या रुग्णवाहिका, पोलिसांचे सायरन आणि पीडितांच्या किंकाळ्या ही सगळी परिस्थिती परिस्थितीची भीषणता सांगूण जात आहे. रुग्णालयेही जखमींनी पूर्ण भरलेली आहेत. मदत आणि बचाव पथक प्रत्येक क्षणी मदत करण्यात गुंतले आहेत.

 


हेही वाचा :

तुर्की, सीरियात मृत्यूचं तांडव! भूकंपातील मृतांची संख्या 7800 पार

First Published on: February 8, 2023 1:31 PM
Exit mobile version