अमरुल्ला सालेहच्या घरात ६.५ मिलियन डॉलरसह सापडल्या सोन्याच्या १८ विटा; तालिबानचा दावा

अमरुल्ला सालेहच्या घरात ६.५ मिलियन डॉलरसह सापडल्या सोन्याच्या १८ विटा; तालिबानचा दावा

अमरुल्ला सालेहच्या घरात ६.५ मिलियन डॉलरसह सापडल्या सोन्याच्या १८ विटा; तालिबानचा दावा

अफगाणिस्तानातील बंडखोरांचा गड असलेल्या पंजशीर व्हॅलीच्या एका मोठ्या भागावर तालिबानी कब्जा केला. या तालिबानी अतिरेक्यांनी असा दावा केला की, त्यांना अमरुल्ला सालेहच्या घरातून ६.५ मिलियन डॉलर म्हणजेच साधारण ४८ कोटी रुपये मिळाले आहेत. आता अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आहे. तालिबान्यांनी काबुलमधील माजी उपराष्ट्रपती आणि वॉर लॉर्ड अब्दुल रशीद दोस्तम यांच्या आलिशान हवेलीवर कब्जा केला आहे. अशरफ घनी सरकारचे उपराष्ट्रपती असलेल्या अमरुल्ला सालेहवर तालिबानने मोठे आरोप केले आहेत.

तालिबानने पंजशीरमध्ये युद्ध लढणाऱ्या अमरुल्ला सालेहच्या घरातून ६.५ मिलियन डॉलरसह १८ सोन्याच्या विटा जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा तालिबानने सोमवारी केला असून तालिबानचे सांस्कृतिक आयोग आणि मल्टीमीडिया विंगचे प्रमुख अहमदुल्ला मुत्ताकी यांनी एक व्हिडिओ ट्विट करून हा दावा केला आहे. मुत्ताकीने जारी केलेल्या १ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ८ ते १० तालिबान्यांनी युएस डॉलर्सचे बंडल आणि दोन सूटकेसमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या विटांकडे पाहणी करताना दिसले. काही जण त्यांच्या मोबाईलच्या मदतीने ठेवलेल्या डॉलर्स आणि विटांचे फोटोही काढताना दिसत आहेत. हे डॉलर्स कधी जप्त करण्यात आले याबाबत मुत्ताकीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या भावाला देखील जीवे मारले होते. अमरुल्लाह सालेह हे पंजशीर घाटीमधील नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. सालेह अजूनही तालिबानविरुद्ध युद्ध लढत आहे. पंजशीरमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अमरुल्ला सालेह आणि अहमद मसूद आल्यानंतरच सुरक्षित ठिकाणी गेल्याचे सांगण्यात येत आहे.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

First Published on: September 13, 2021 7:31 PM
Exit mobile version