Video : तालिबान्यांच्या हाती लागलं घबाड, अमरुल्ला साहेलच्या घरात सापडल्या सोन्याच्या विटा अन् पैशांच्या बॅग

Video : तालिबान्यांच्या हाती लागलं घबाड, अमरुल्ला साहेलच्या घरात सापडल्या सोन्याच्या विटा अन् पैशांच्या बॅग

Video : तालिबान्यांच्या हाती लागलं घबाड, अमरुल्ला साहेलच्या घरात सापडल्या सोन्याच्या विटा अन् पैशांच्या बॅग

अफगाणिस्तानवर तालिबानने सत्ता स्थापन करताच हुकुमशाही राजवट सुरु केली आहे. क्रुर तालिबानला पंजशीर प्रांतातून मोठ्याप्रमाणात विरोध करण्यात आला. मात्र मागील आठवड्यात तालिबानने पंजशीरमध्येही तालिबानने कब्जा मिळवला आहे. त्यामुळे अफगाणिस्तावर आता पूर्णपणे तालिबानचे क्रुर, जुलमी हुकुमशाही राजवटीची सत्ता आहे.

अशातच पंजशीरमध्ये तालिबानला विरोध करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून मोठं घबाड हाती लागलं आहे. तालिबान्यांना सालेह यांच्या घरातून कोट्यवधी डॉलर्स आणि सोन्याची बिस्किटे सापडली आहे. बॅगच्या बॅग भरुन नोटा मोजताना दिसतायत. या नोटा मोजताना तालिबान्यांना घाम फुटलाय. यासंबंधीत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

तालिबानच्या मल्टिमीडिया शाखेचा प्रमुख अहमदुल्ला मुत्तकी याने ट्वीटरवर याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला. सालेह यांच्या घरावर छापा मारल्याचा दावा त्याने केला आहे. सालेह यांच्या घरातून तालिबान्यांना तब्बल ६५ लाख डॉलर्स, १८ सोन्याची बिस्किटे तर मोठ्या प्रमाणावर दागिनेही हाती लागेले आहेत. मात्र एवढी संपत्ती मोजता मोजता तालिबान्यांच्या नाकी नऊ आलेत. व्हायरल व्हिडीओत तालिबान्यांच्या हातात डॉलरचे बंडल आहेत. बाजूला सोन्याच्या वीटाही आहेत.

तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळताच महिन्याभरात येथील अनेक शहारांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्नाचे सर्वच मार्ग बंद झाल्याने त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही अक्षरश: वणवण करावी लागतेय. अशा परिस्थितीत अनेकांनी घरातून वस्तू विकायल्या काढल्यात. काबूलमधील चमन-ए-होजोरी नावाचा एक बाजारात तिथेली लोक घरातील भांडी, पंखे, सोफासेट इत्यादी वस्तू विकण्यासाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच खराब होईल यात काही शंका नाही.


First Published on: September 15, 2021 11:54 AM
Exit mobile version