तालिबानला मोठा झटका! हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिसची हत्या

तालिबानला मोठा झटका! हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिसची हत्या

तालिबानला मोठा झटका! हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिसची हत्या

अफगाणिस्तामध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर पाकिस्तानची दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला मोठा झटका लागला आहे. तालिबान सरकारमध्ये गृहमंत्री झालेले हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानीचा मुख्य सैन्य रणनीतीकार आणि काबुलचा कमांडर हमदुल्ला मुखलिस याची हत्या करण्यात आली आहे. काबुलमध्ये मंगळवारी बंदूकधारी समूहाने काबुलमधील सर्वात मोठ्या लष्काराच्या रुग्णालयावर अंदाधुंद गोळाबार केला. या आत्मघाती हल्ल्यात कमांडर हमदुल्ला मुखलिसची हत्या करण्यात आली. काबुलवर ताबा मिळवल्यानंतर हमदुल्ला पहिल्यांदा राष्ट्रपती अशरफ गनीच्या कार्यालयात घुसला होता. गनी यांच्या खुर्चीवर बसलेला मौलवी हमदुल्ला मुखलिसचा फोटो देखील प्रचंड व्हायरल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हमदुल्ला तालिबानच्या स्पेशल फोर्स बद्री ब्रिगेडचा कमांडर होता. याच ब्रिगेडला काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे तो याआधी पाकटिका आणि खोश्त प्रांतात तालिबानच्या शॅडो गवर्नचा देखील भाग होता. मात्र आता तालिबानी कमांडरच्या मृत्यूमुळे हक्कानी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.

काबुल येथे मंगळवारी मोठ्या प्रमाणत सीरियल बॉम्बस्फोट झाले. ज्याच आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. कमांडर हमदुल्ला मुखलिसच्या आत्मघाती हल्ल्यासाठी आईएसआईएस संघटनेच्या दहशतवाद्यांना जबाबदार माननण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत हत्येची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. अफगाणिस्तामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला पत्रकार बिलारी सरवरी याने ट्विट करत, आयएलआयएसचे आतंकवादी त्यांच्या पहिल्या महत्त्वपूर्ण टार्गेटची हत्या करण्यात यशस्वी झाले आहेत. हमदुल्ला तालिबानचा सर्वात महत्त्वाचा नेता होता. त्याचा हत्येनंतर आता तालिबानचे नेतृत्व ढासळले असल्याचे म्हटले आहे.

बिलालने पुढे म्हटले की, येणाऱ्या दिवसात आणि महिन्यांमध्ये होणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. अफगाणिस्तानमध्ये नवीन अव्यवस्थेची सुरुवात होत आहे? यामुळे तालिबानचे बळ वाढण्यास मदत होईल? या हल्ल्यानंतर आयएसआयएसचे मनोबल वाढून तालिबान नेतृत्वाच्या विरोधात आणखी जास्त हल्ले करेल? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदनीने या हल्लावर प्रतिक्रीया देत म्हटले की, हा आत्मघाती हल्ला ४०० खाटांचे लष्कराचे सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या प्रवेश द्वाराजवळ झाला. इस्लामिक स्टेटचे बंदूकधारी दहशतवाद्यांच्या समूहाने जवळपास१५ मिनिट अंदाधुंद गोळाबार केला. तालिबानच्या स्पेशल फोर्सेज कमांडोची टीम हेलीकॉप्टरच्या माध्यमातून रुग्णालयाच्या परिसरात एयर ड्रॉप करण्यात आले होते. यामुळे रुग्णालयावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना थांबवण्यात यश आले.

First Published on: November 3, 2021 11:30 AM
Exit mobile version