द्राविडी नेते पेरियार, यांच्या पुतळ्याची विटंबना

द्राविडी नेते पेरियार, यांच्या पुतळ्याची विटंबना

चेन्नईमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना (सौजन्य- ANI)

‘द्राविडी’ चळवळीचे प्रणेते अशी ओळख असलेलं व्यक्तिमत्व ‘पेरियार’. आज चेन्नईमध्ये पेरियार यांची १३९ वी जयंती साजरी केली जात असताना एक अनुचित प्रकार घडला. चेन्नईतील तिरप्पूरमध्ये काही अज्ञातांनी पेरियार यांच्या पुतळ्यावर चप्पल ठेवून त्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याआधी एकदा पेरियार यांच्या पुतळ्याचे मुंडके देखील उडवण्यात आले होते. दरम्यान सध्या या अनुचित प्रकाराबाबत तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केल्याचं समजतं आहे. दरम्यान पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे स्थानिकांमधून तसंच राजकीय वर्तळातून नाराजी व्यक्त केली जात आहे. पेरियार यांचं मूळ नाव इरोडो वेंकटप्पा रामास्वामी असं होतं. मात्र, राजकीय वर्तुळात आणि विशेषत: द्राविडी चळवळीमध्ये ‘पेरियार’ या नावानेच ते प्रसिद्ध होते.

 

विटंबनाची दुसरी वेळ

दरम्यान पेरियार यांच्या पुतळ्याची अशाप्रकारे विटंबना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच वर्षी मार्च महिन्यामध्ये पेरियार यांच्या वेल्लोर (चेन्नई) येथील पुतळ्याचे मुंडके उडवण्यात आले होते. याप्रकरणी सीआरपीएफच्या एका जवानाला अटक करण्यात आली होती. सिआरपीएफच्या जवानाने पेरियार यांच्या पुतळ्याचे मुंडके कापून त्याची विटंबना करत ते भर रस्त्यात फेकले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे विकृत कृत्य करणाऱ्या त्या जवानाला अटक करण्यात आली होती.


वाचा : लग्नाचा आहेर म्हणून दिले ‘पेट्रोल’

First Published on: September 17, 2018 3:11 PM
Exit mobile version