तामिळनाडूत प्राप्तिकर अधिकाऱ्यांवर हल्ला, डीएमकेच्या 2 नगरसेवकांसह 10 आरोपींना अटक

तामिळनाडूत प्राप्तिकर अधिकाऱ्यांवर हल्ला, डीएमकेच्या 2 नगरसेवकांसह 10 आरोपींना अटक

तामिळनाडू येथे डीएमकेच्या दोन नगरसेवकांसह 10 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्यांवर प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याचा आरोप होता. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा प्राप्तिकर अधिकार्‍यांनी मंत्री सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित परिसराची झडती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि छापे टाकण्यापासून रोखले.

हल्ल्यात अधिकारी जखमी

डीएमके नेत्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे प्राप्तिकर अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजते. हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला केला. तसेच, त्यांच्या विंडशील्डची चकमक उडवली आणि त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर अधिकाऱ्यांना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. (tamil nadu dmk councilor including nine people arrested in income tax officials attack case)

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक

याप्रकरणी करूर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या लोकांची ओळख पटली ज्यांनी प्राप्तिकर अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात अडथळे आणले. ते म्हणाले की, डीएमकेच्या दोन नगरसेवकांसह आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यालाही रिमांडवर पाठवण्यात आले होते. याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.


हेही वाचा – कर्नाटकच्या पराभवानंतर मोदींकडून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा क्लास, योगींच्या अनुपस्थितीची चर्चा?

First Published on: May 29, 2023 11:01 AM
Exit mobile version