द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांचे निधन

द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांचे निधन

करुणानिधी यांचे निधन

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने करुणानिधी यांना २९ जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज त्यांचे ६ वाजून ४५ मिनिटाने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या कावेरी रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उद्या चेन्नईला रवाना होणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनि करुणानिधी यांची घेतली भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ५ ऑगस्टला करुणानिधी यांची चेन्नई येथे भेट घेतली होती. हैदराबाद दौऱ्यावर असताना रामनाथ कोविंद यांनी हैदराबाद दौरा संपून चेन्नई येथे जाऊन करुणानिधी आणि त्यांचे पुत्र एम.के.स्टालिन यांची भेट घेतली होती. तसेच करुणानिधी यांच्या आरोग्याची चौकशी करत त्यांच्या कुटुंबियांचे देखील सांत्वन केले होते.

करुणानिधी यांच्या आजारपणाची माहिती मिळताच अनेक नेत्यांनी तसंच सेलिब्रिटींनी त्यांची कावेरी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली होती. गेल्या आठवड्यात अनेक राजकिय नेत्यांनी करुणानिधी आणि त्यांचा मुलगा एम के स्टॅलिन यांची भेट घेतली होती. उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी त्यांची भेट घेऊन तब्बेतीचे विचारणा केली होती.

राहुल गांधी यांनी करुणानिधींची भेट घेतली.

काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी ३१ जुलैला कावेरी रुग्णालयात जाऊन करुणानिधी यांची भेट घेतली होती. करुणानिधी यांचा मुलगा द्रमुकचे नेते एम के स्टॅलिन यांच्याकडून करुणानिधी यांच्या तब्बेतीसंदर्भात विचारपूस केली होती.

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी करुणानिधी यांची भेट घेतली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील करुणानिधी यांची भेट घेतली होती.करुणानिधी यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कळताच शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी चेन्नईला कावेरी रुग्णालयात जाऊन करुणानिधी यांची भेट घेतली.

सुपरस्टार रजनिकांत यांनी देखील मंगळवारी संध्याकाळी करुणानिधी यांची कावेरी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. रजनिकांत यांनी देखील करुणानिधींच्या तब्बेतीबद्दल विचारपूस केली होती.

First Published on: August 7, 2018 6:56 PM
Exit mobile version