तमिळनाडूमध्ये आढळला दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण

तमिळनाडूमध्ये आढळला दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण

तमिळनाडूमध्ये आढळला दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण

तमिळनाडूत बुधवारी करोना व्हायरसचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. दिल्लीतील या रुग्णांची करोना चाचणी झाली. या रुग्णाला राजीव गांधी शासकीय जनरल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सद्या स्थिर आहे. तमिळनाडूमध्ये ७ मार्चला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. तो ४९ वर्षांचा असून तो आखाती देशातून परतला असल्याचं समोर आलं होत. त्यानंतर त्याच्यावर उपचार केल्यामुळे त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे त्याला मंगळवारी दुपारी राजीव गांधी शासकीय जनरल हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

चेन्नईच्या माहितीनुसार, करोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता आढळलेला रुग्ण दिल्लीचा आहे. तो आयसोलेशन वॉर्डमध्ये असून त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहे, असं आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

मंळवारीपर्यंत १४० पैकी १३८ जणांची करोना चाचणी ही निगेटिव्ह आल्याची नोंद झाली आहे. तर एका रुग्णांची करोना चाचणीचा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. जगभरात आतापर्यंत २ लाख ४ हजार ४०५ करोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यापैकी ८ हजार २३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८२ हजार ४५२ जण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – Corona Live Updates : राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४४वर!


 

First Published on: March 18, 2020 9:19 PM
Exit mobile version