Video: नदीवर पाण्याऐवजी विषारी फेसाची लाट

Video: नदीवर पाण्याऐवजी विषारी फेसाची लाट

Video: नदीवर पाण्याऐवजी विषारी फेसाची लाट

कोरोनासोबतच देशात प्रदूषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदूषणामुळे तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तमिळनाडूच्या मदुरई परिसरातील नदीवर विषारी फेस आला. हा नक्की काय प्रकार आहे हे कोणाच्याही लक्षात आले नाही. नदीवर पाण्याऐवजी विषारी फेसाची लाट आल्याने लोक संभ्रमात पडले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा फवारा मारून नदीवर आलेला फेस घालवण्याचे प्रयत्न करत आहेत. या विषारी थरावर पाणी मारल्यानंतर त्याचा फेस तयार होत आहे. हा फेस पांढऱ्या शुभ्र कापसासारखा दिसत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा विषारी फेस नदीवर कसा आला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

तमिळनाडूच्या मदुरई येथील नदीवर अचानक कापसासारखा विषारी थर जमा झाला. या फेसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरूवातीला हा विषारी थर कमी होता. परंतु काही वेळानंतर त्याचे प्रमाणात वाढले. त्यामुळे परिसरातील लोकांचा गोंधळ उडाला आहे. तमिळनाडू आणि पेदूचेरीवर निवारी चक्रीवादळाचे संकट आले. या चक्रीवादळामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तिथले जनजीवन विस्कळी झाले आहे.

येत्या ४८ तासात दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पाऊसाचा जोर वाढल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदीवर आलेला विषारी थर आजूबाजूच्या परिसरात पसरण्याची शक्यता आहे. या विषारीधूरामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अग्निशामन दलाकडून हा विषारी थर बाजूला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा – Video: भारतीय सैन्याने केली नवजात बाळ आणि आईची मदत

First Published on: November 28, 2020 1:53 PM
Exit mobile version