हरवलेला नवरा सापडला टिकटॉकवर!

हरवलेला नवरा सापडला टिकटॉकवर!

'टिक टॉक'

मागील कित्येक दिवस टिकटॉक हे मोबाईल अॅप्लिकेशन चांगल्या-वाईट कारणांमुळे नेहमीच चर्चेत होतं. भारतामध्ये टिकटॉक अॅप्लिकेशनवरून अनेकदा गदारोळ माजलेला आहे. तरूण पिढी या शॉर्ट व्हिडिओ अॅपच्या आहारी जात असल्याने अनेकांनी टिकटॉक अॅप्लिकेशनला विरोध केला. मात्र हेच टिकटॉक अॅप्लिकेशनच मदतीला आले असे म्हणता येईल.

टिकटॉक व्हिडिओमुळे पठ्ठ्याचा शोध

तामिळनाडूमधून एक व्यक्ती आपल्या पत्नीसह मुलांना सोडून फरार झाला होता. तब्बल ही व्यक्ती तीन वर्षांनी सापडली. विशेष म्हणजे या टिकटॉक अॅप्लिकेशनवर असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून या पठ्ठ्याचा शोध लागला. २०१६ साली सुरेश आपल्या कुटुंबाला सोडून फरार झाला तर पुन्हा परतलाच नाही. सुरेश याचं जयाप्रदासोबत विवाह झाला होता. त्यांना दोन मुलं देखील आहेत. २०१६ मध्ये शुल्लक कारणांवरून दोघांत वाद झाला होता त्यानंतर तो घर सोडून निघून गेला. त्याच्या घरच्यांनी खूप शोध घेतला परंतु त्याचा तपास लागला नाही.

एफआयआर दाखल करून पतीचा शोध नाही

तमिळनाडूतील विल्लूपूरम जिल्ह्यातील ही घटना असून पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्या व्यक्तीला त्याच्या परिवारासह घरी पाठवले होते. जयाप्रदा यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नातेवाईक, मित्र सगळ्यांकडे चौकशी करुनही सुरेशचा काही पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता, पण तो कुठे आहे हे समजणं कठीण झालं होते.

टिकटॉकच्या सहाय्याने लागला सुरेशचा शोध

काही दिवसांपुर्वी जयाप्रदा यांच्या एका नातेवाईकाला टिकटॉक अॅपवर सुरेशसारखा दिसणारा एक व्यक्ती दिसल्याने जयाप्रदा यांना कळवलं तेव्हा हा आपला पती सुरेशच असल्याचं त्यांनी सांगितलं. जयाप्रदा यांनी तात्काळ पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी टिकटॉकच्या सहाय्याने सुरेशचा शोध लावला.

एका ठिकाणी मेकॅनिक म्हणून त्याचे काम सुरु होते, यासोबत तो एका तृतीयपंथासोबत संबंधातदेखील होता. तिच्यासोबतच त्याने टिकटॉक व्हिडीओ तयार करून टिकटॉक अॅप्लिकेशनवर शेअर केला होता. या व्हिडिओच्या मदतीने तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या सहाय्याने पोलिसांनी सुरेशचा पत्ता मिळवत त्याचा शोध घेतला.

First Published on: July 4, 2019 9:41 AM
Exit mobile version