टाटाकडून इल्कर आयसी यांची Air Indiaच्या CEO आणि MD पदी नियुक्ती

टाटाकडून इल्कर आयसी यांची Air Indiaच्या CEO आणि MD पदी नियुक्ती

टाटाकडून इल्कर आयसी यांची Air Indiaच्या CEO आणि MD पदी नियुक्ती

एअर इंडिया (Air India) कंपनीच्या सीईओ (CEO) आणि एमडी (MD) पदी टाटा सन्सकडून इल्कर आयसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इल्कर आयसी नुकतेच तुर्की एअरलाईन्सचे चेअरमन होते. इल्कर आयसी यांच्या नावाला एअर इंडियाच्या CEO पदी मंजूरी देण्याकरीता एअर इंडियाच्या बोर्डाने सोमवार 14 फेब्रुवारीला बैठक घेतली. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर हेदेखील विशेष निमंत्रित म्हणून बोर्डाच्या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीतच इल्कर आयसी यांची एअर इंडियाच्या सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

इल्कर आयसी हे 1 एप्रिल 2022 पासून ही जबाबदारी स्वीकारणार असल्याचे टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर यांनी म्हटले आहेत. इल्कर आयसी हे एव्हिएशन क्षेत्रातील आहेत. त्यांनी संपूर्ण तुर्की एअरलाईन्सची धुरा सांभाळली आहे. इल्कर यांचे टाटा समूहात स्वागत करताना आम्हाला फार आनंद होत असल्याचे चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

इल्कर आयसी यांनी तुर्कीतील बिल्केंट विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि पब्लिक अॅडमिनिस्ट्रेसन विभागाच्या 1994 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. एका वृत्तानुसार, इल्कर आयसी तुर्की फुटबॉल फेडरेशन, तुर्की एअरलाइन्स स्पोर्ट्स क्लब आणि TFF Sportif Anonymous Sirketi चे बोर्ड सदस्य आहेत.इल्कर आयसी हे मुळचे इस्तांबुलमधील असून, त्यांचा जन्म 1971 मध्ये झाला.


हे ही वाचा – शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना दणका, १ वर्षाचा तुरुंगवास अन् कोटींच्या दंडाची शिक्षा


 

First Published on: February 14, 2022 7:41 PM
Exit mobile version