Air India खरेदी करण्यासाठी Tata Sonsने लावली बोली; शेवटच्या टप्प्यात पोहोचली गुंतवणुकीची प्रक्रिया

Air India खरेदी करण्यासाठी Tata Sonsने लावली बोली; शेवटच्या टप्प्यात पोहोचली गुंतवणुकीची प्रक्रिया

Aircraft Fuel Price : विमान प्रवास महागणार, हवाई इंधन दरात ३.२ टक्क्यांची वाढ

देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी एअर इंडिया खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून बोली लावण्यात आली आहे. याबाबत बुधवारी सरकारने माहिती दिली आहे. यादरम्यान टाटा सन्सने एअर लाईन्सवर बोली लावल्याची माहिती टाटा सन्सच्या प्रवक्तांनी दिली आहे. दीपम (DIPAM) सचिव तुहिन कांता पांडे यांनी याप्रकरणी ट्वीट करत लिहिले आहे की, एअर इंडियाच्या गुंतवणूकासाठी आर्थिक बोली व्यवहार सल्लागाराला मिळाला आहे. आता गुंतवणुकीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.

सरकार मालिकीची राष्ट्रीय एअरलाईन्समधील आपली १०० टक्के भागीदारी विकण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये एआय एक्सप्रेस लिमिटेडमध्ये एअर इंडियाची १०० टक्के भागीदारी आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ५० टक्के भागीदारी सामील आहे.

जानेवारी २०२०पासून सुरु झालेल्या एअर इंडियाच्या भाग विक्री प्रक्रियामध्ये कोरोनाचा सामना करावा लागला. एप्रिल २०२१मध्ये सरकारने संभाव्य बोलीदारांना आर्थिक बोली लावण्यास सांगितले होते. सरकार एअर इंडियामधील आपले संपूर्ण १०० टक्के भाग विकत आहे.

२००७ पासून एअर इंडिया देशांतर्गत ऑपरेटर इंडियन एअरलाईन्समध्ये विलीन झाल्यापासून तोट्यात आहे. कोरोनामुळे कंपनीतील भाग विक्री प्रक्रियेला वेळ लागला आहे. सरकारने एअरलाईन्ससाठी प्रारंभी बोली जमा करण्याच्या तारखा पाच वेळा वाढवल्या आहेत.

एअर इंडिया सुरुवातीला १९३२मध्ये एक मेल कॅरियर स्वरुपात सुरू केली होती. विमान कंपनीला ४ हजार ४०० देशांतर्गत आणि १ हजार ८०० आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि देशांतर्गत विमानतळांवर पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर ९०० स्लॉट्सचे नियंत्रण बोलीदाराला मिळेल. याव्यतिरिक्त, बोली लावणाऱ्याला कमी किमतीच्या एअर इंडिया एक्स्प्रेसचे १०० टक्के आणि एआयएसएटीएसचे ५० टक्के मिळतील, जे प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.


हेही वाचा – Indian Railway : भारतीय रेल्वेच्या ‘या’ सेवा लवकरच होणार बंद, पण प्रवास होणार जलद


 

First Published on: September 16, 2021 2:26 PM
Exit mobile version