कोरोनाविरोधी लसीकरणात सर्वप्रथम शिक्षकांसह शालेय कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या – WHO

कोरोनाविरोधी लसीकरणात सर्वप्रथम शिक्षकांसह शालेय कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या – WHO

देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले जातायतं. अशातच अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाविरोधी लस घेणे अधिक महत्त्वाचे आहे. असातच जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने सोमवारी सांगितले की, युरोप आणि मध्य आशियायी देशांमध्ये शाळा सुरु ठेवण्यासाठी कोरोनाविरोधी लसीकरणाच्या प्राधान्य गटांमध्ये शिक्षकांसह शालेय कर्मचाऱ्यांना समाविष्ट करणे आवश्यक आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माहितीनुसार, कोरोना महामारीदरम्यान शाळा सुरु ठेवण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण अभियानातील प्राधान्य गटांमध्ये शालेय शिक्षक, कर्मचारी यांचा समावेश करत त्यांचे लसीकरण पूर्ण करावे. यापुढे संघटनेने सांगितले की, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होतायतं. यामुळे कोरोनाच्या घातक डेल्टा व्हेरियंटच्या संक्रमाणातही शालेय शिक्षण सुरु ठेवणे गरजेचे आहे.

WHO चे युरोपिय क्षेत्राचे संचालक हँस क्लूज यांनी सांगितले की, शिक्षण, मानसिक आरोग्य आणि सामाजिक कौशल्यासाठी विद्यार्थी निरोगी आणि समाजासाठी एक प्रोडक्टिव्ह सदस्य असले पाहिजेत. मात्र कोरोना महामारीने शिक्षण क्षेत्रात एक मोठा अडथळा निर्माण केला आहे. तसेच या संघटनेने सर्व देशांना १२ वर्षावरील मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


Afghanistan crisis : कंधारमध्ये लपून बसलाय तालिबानचा ‘मोस्ट वाँटेड’ हिबतुल्लाह अखुंदजादा हा दहशतवादी, लवकरचं येईल जगासमोर


 

First Published on: August 30, 2021 2:50 PM
Exit mobile version