घरदेश-विदेशAfghanistan crisis : कंधारमध्ये लपून बसलाय तालिबानचा 'मोस्ट वाँटेड' हिबतुल्लाह अखुंदजादा हा...

Afghanistan crisis : कंधारमध्ये लपून बसलाय तालिबानचा ‘मोस्ट वाँटेड’ हिबतुल्लाह अखुंदजादा हा दहशतवादी, लवकरचं येईल जगासमोर

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी अराजकता माजवली आहे. काबुल विमानतळावर सध्या दहशतवादी हल्ल्यांचे संकट आहे. अशा परिस्थितीत तालिबानचा एक मुख्य कमांडर आणि आतंकवादी संघटनेचा म्होरक्या हिबतुल्ला अखुंदजा हा कंधारमधील एक अज्ञात स्थळी लपून बसला आहे. लवकरचं त्याला जगासमोर आणले जाणार आहे. याविषयी तालिबानी प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद याने एक पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. हिबहतुल्ला अखुंदजा हा तालिबामधील काही निवड दहशतवादी प्रमुख नेत्यांपैकी एक आहे, ज्यांच्याविषयी फारच कमी माहिती असते. ही माहिती अतिशय जवळच्या लोकांपर्यंतच मर्यादित असते. अखुंदजादा आत्तापर्यंत कधीही सार्वजनिकरित्या जगासमोर आलेला नाही. मात्र त्याचा इशाऱ्यावरच तालिबानी दहशतवाद्यांच्या कारवाई सुरु असतात.

तालिबानचे उप-प्रवक्ते बिलाल करामी यांनी सांगितले की,  हिबतुल्ला अखुंदजा हा सुरुवातीपासून कंधार येथे राहतोय आणि तो लवकरच जगासमोर येईल. साल २०१६ मध्ये त्याने तालिबानची कमान सांभाळली होती. अखुंदजादा अशाप्रकारे लपून राहतो की इतर दहशतवादी त्याला कधी पाहूच शकणार नाहीत. त्याच्या दररोजच्या वैयक्तिक जीवनाविषयी देखील कोणतीच खबर नसते. मात्र इस्लामिक उत्सवांवर व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून तो आपल्या दहशतवाद्यांना संदेश देत असतो.

- Advertisement -

अखुंदजादा हा तालिबानच्या असा नेता आहे जो अत्यंत शिताफिने लपून बसत दहशतवाद्या कारवाया करतोय. यापूर्वी देखील दहशतवादी संघटनांची कमाल सांभाळणाऱ्या नेत्यांना अशाप्रकारे लपवून ठेवले गेले. यापूर्वी मुल्ला उमर याने तालिबानची कमान सांभाळली होती. मात्र तालिबानी प्रशासनाच्या राजवटीत तो खूप कमी वेळा काबुलमध्ये आला. या उमरचे वास्तव्यही कंधारमध्येच होते. त्यामुळे तालिबानी दहशतवादी नेत्यांसाठी कंधार हे नेहमीच एक मोठे केंद्र राहिले आहे.

मात्र अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवताच अखुंदजादाचे आत्तापर्यंत एकही विधान समोर आले नाही. परंतु या दशतवादी नेत्याच्या इशाऱ्याशिवाय तालिबानी दहशतवादी एक पाऊलही पुढे टाकत नाही. तालिबानी याला अमीर अल मौमिन किंवा मुल्ला या नावाने देखील ओळखतात. हा शरिया कोर्टाचे प्रमुख देखील आहे. याला फतवा जाहीर करण्यासाठी देखील ओखळले जाते.

- Advertisement -

हिबतुल्ला अखुंदजाचा जन्म कंधारमध्येच झाला आहे. हिबतुल्लाचा अर्थ अरबी भाषेत देवाची भेट असा होतो. त्याचे कुटुंबीय बलुचिस्तानमधील क्वेटामध्ये स्थायिक झाले. १९८० च्या सुमारास त्याने रशियन सैन्याविरुद्ध आवाज उठवला होता. अशातच २०१७ मध्ये अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या आत्महत्या हल्ल्यात त्याचा एक मुलगा ठार झाला. २०१२ आणि २०१९ मध्ये त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परंतु यातून तो बचावला.


तणाव वाढणार! चीनने परदेशी जहाजांवर नियंत्रण ठेवण्याकरिता नवीन नियम केले लागू


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -