‘हैदर’ चित्रपटातला तो कलाकार बनला दहशतवादी!

‘हैदर’ चित्रपटातला तो कलाकार बनला दहशतवादी!

‘हैदर’ चित्रपटातील कलाकार झाला दहशतवादी, लष्करानं केला खात्मा!! ही लाईन वाचल्यानंतर डोळे चमकले ना? पण, ही सत्य परिस्थिती आहे. ‘हैदर’ या हिंदी चित्रपटामध्ये काम केलेल्या कलाकाराला जवानांनी श्रीनगरमधील मुजगुंड ठार केलं आहे. ९ डिसेंबर येथे त्याला ठार करण्यात आलं. १८ तास दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू होती. साकीब बिलाल असं ठार केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. साकीब सोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. साकीब बिलाल हा अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिकत होता. त्याच्यासोबत नववीमध्ये शिकणारा एक जण देखील ठार झाला आहे. दोघेही हाजीन बंडीपोरा येथील एका शाळेत शिक्षण घेत होते. ३१ ऑगस्टपासून दोघंही घरातून गायब झाले होते. दोघांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला गेला. पण, काही पत्ता नाही लागला. अखेर त्यांच्या मृत्यूची बातमी आली आणि घरच्यांना धक्का बसला. दरम्यान, साकीबनं दहशतवादाचा मार्ग का निवडला हेच आम्हाला कळत नसल्याची प्रतिक्रिया घरच्यांनी दिली.

घरातील सामान आणण्यासाठी साकिब घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. घरच्यांनी खूप शोध घेतला. पण, सारं निष्पळ ठरलं. साकिबला अभिनयाचीही आवड होती. तर, फुटबॉल, तायक्वाँडो आणि कब्बडीची देखील साकिबला आवड होती. अभिनयाची आवड जपण्यासाठी तो नाटकांमध्ये काम करायची अशी माहिती साकिबच्या मामानं दिली. साकिबच्या घरच्यांची उपजीविका ही शेतीवर असून ठार करण्यात आलेला दुसरा दहशतवाद्याच्या घरच्या परिस्थिती देखील बेताचीच आहे.

घर सोडून गेल्यानंतर दोन्ही मुलं लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेसोबत काम करू लागली. पोलिसांनी तशी माहिती दिली आहे. दोघांना लष्करानं ठार केल्यानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दरम्यान लष्कराच्या कारवाईविरोधात स्थानिक आता प्रश्न विचारू लागले आहेत.

आज घडीला दहशतवादी संघटना या स्थानिक तरूणांना गाठून त्यांची माथी भडकवण्याची काम करत आहेत. पण, त्याचवेळी तरूण लष्करामध्ये सामील होऊन देखील उत्तर देत आहेत.

वाचा – सोपोरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वाचा – जम्मू – काश्मीरमधील २५९ तरूण सैन्यात

First Published on: December 13, 2018 2:03 PM
Exit mobile version