भारतातली पहिली खासगी रेल्वे ‘तेजस’ एक्स्प्रेस बंद होणार!

भारतातली पहिली खासगी रेल्वे ‘तेजस’ एक्स्प्रेस बंद होणार!

महिला रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! IRCTC कडून मिळतेय कॅशबॅक आणि डिस्काऊंटची ऑफर

कोरोना काळात अनेक खासगी उद्योगधंद्यांवर संक्रांत आल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र, या काळात भारतातली पहिली खासगी रेल्वे सेवा म्हणून नाव कमावलेल्या ‘तेजस’ एक्स्प्रेसवर देखील कोरोनामुळे संक्रांत आली आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुरू झालेली ‘तेजस’ पुन्हा एकदा यार्डात नेऊन उभी करावी लागणार आहे. येत्या २२ नोव्हेंबरपर्यंत तेजसची सेवा सुरू राहणार असून त्यानंतर पुढील निर्णय होईपर्यंत तेजस रेल्वे बंदच ठेवली जाणार असल्याचं आयआरसीटीसीकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे खासगी सेवा असल्यामुळे नफा घटल्यामुळे तिची सेवा बंद करण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर २०१९ रोजी तेजस एक्स्प्रेसची सेवा सुरू करण्यात आली होती. लखनऊ – दिल्ली – लखनऊ असा तेजस एक्स्प्रेसचा पहिला मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र अवघ्या वर्षभरातच ती बंद करण्याची वेळ ओढवली आहे. प्रवाशांनी तेजसच्या सेवेकडे पाठ फिरवल्यामुळे आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नवी दिल्ली ते लखनऊ ही सेवा २३ नोव्हेंबरपासून तर मुंबई-अहमदाबाद ही सेवा २४ नोव्हेंबरपासून पुढचा आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

सात महिने लॉकडाऊनमध्ये बंद राहिल्यानंतर तेजसची सेवा १७ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाली होती. पण ऐन दिवाळीच्या दिवशी म्हणजेच १४ नोव्हेबंरला प्रवासी नसल्यामुळे ही सेवा पुन्हा बंद ठेवण्यात आली. रेल्वेकडून जेवण आणि १० लाख रुपयांचा मोफत विमा देऊन देखील १८ नोव्हेंबर रोजी ६६२ तर १९ नोव्हेंबर रोजी ६७० सीट्स रिकाम्या राहिल्या होत्या. इतर रेल्वेंना देखील आर्थिक फटका बसत असला, तरी तेजस पूर्णपणे खासगी तत्वावर चालवली जात असल्यामुळे सरकारी पाठिंब्याचा तेजसला फायदा होत नाही.

First Published on: November 17, 2020 3:25 PM
Exit mobile version