तेजस ठाकरेचे नवे संशोधन, शोधल्या निमास्पिस कुळातील पालींच्या प्रजाती

तेजस ठाकरेचे नवे संशोधन, शोधल्या निमास्पिस कुळातील पालींच्या प्रजाती

निमास्पिस कुळातील पालीच्या ३ नव्या प्रजातींचा शोध लावण्याचा आणखी एक नवा मानाचा तुरा ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या कामात रोवण्यात आला आहे. ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनमधील तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अग्रवाल या संशोधनकांनी तीन राज्यांमध्ये या पालीच्या नव्या प्रजाती शोधल्या आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यातून या पालींच्या प्रजातींचा शोध घेण्यात या टीमला यश आले आहे. या पश्चिमी घाटातील तिन्ही राज्यातून या प्रदेशनिहाय अशा प्रजातींचा उलगडा या त्रिकुटाने केला आहे. अतिशय दुर्मिळ अशा निमास्पिस प्रजातींमधील या पाली आहेत.

झुआटॅक्सा या ऑनलाईन सायंटिफिक जर्नलमध्ये या नव्या संशोधनाचे दोन प्रबंध प्रकाशित झाले आहेत अशी माहिती खुद्द तेजस ठाकरे यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमधून दिली आहे. महाराष्ट्रातील हरिश्चंद्र गड तसेच तामिळनाडूतील कृष्णगिरी या भागातील अतिशय दुर्मिळ अशा स्वरूपाच्या या प्रजाती आहेत. तुम्हालाही या पाली आवडतील अशा आशयाचा तेजस ठाकरेच्या पोस्टमधील उल्लेख आहे. पालींच्या या दोन्ही प्रजाती एन्डेमिक म्हणजे अतिशय दुर्गम अशा भागात आढळणाऱ्या असल्याचे तेजसने आपल्या पोस्टमध्ये नमुद केले आहे.

वन्यजीव संशोधक अक्षय खांडेकर , तेजस ठाकरे आणि इशान अग्रवाल यांनी Dwaf Gekos ही पालींची प्रजाती कर्नाटक आणि महाराष्ट्रातू शोधली आहे. कर्नाटकात सापडलेली ही प्रजाती प्रसिद्ध वन्यजीव बायोलॉजिस्ट डॉ जॉर्ज शॅलेर यांच्या नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रजाती त्यांच्या नावाने यापुढच्या काळात ओळखली जाईल.

 


 

First Published on: May 11, 2021 4:46 PM
Exit mobile version