‘सत्तेसाठी तत्त्व सोडली असती तर आज मुख्यमंत्री असतो’

‘सत्तेसाठी तत्त्व सोडली असती तर आज मुख्यमंत्री असतो’

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती ही बिहारसारखीच आहे. आम्ही कधीही सत्तेसाठी नीतीमुल्ये आणि तत्त्व सोडली नाहीत. सत्तेसाठी आम्ही तत्त्वे सोडून भाजपसोबत हातमिळवणी केली तर आज मी बिहारचा मुख्यमंत्री असतो, असे बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले. सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपकडून हातमिळवणी करण्यासाठी आपल्याला ऑफर आली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

भाजपने २०१६ साली जनता दलच्या अगोदर आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यावेळी जर राजदने पक्षतत्त्वांचा विचार केला नसता तर आज बिहारमधील राजकीय समीकरणे फार वेगळी असती. राजद आणि भाजपने सरकार बनवावे आणि मुख्यमंत्रीपद राजदच्या कोणत्याही नेत्याला द्यावे, अशी भाजपकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र, ही ऑफर राजदने धुडकावून लावली, असे तेजस्वी यादव म्हणाले. यावेळी तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली.


हेही वाचा – ‘आम्ही १६२’, या आणि स्वतः बघा; संजय राऊत यांचे राज्यपालांना आमंत्रण

First Published on: November 25, 2019 6:26 PM
Exit mobile version