घरमहाराष्ट्र'आम्ही १६२', या आणि स्वतः बघा; संजय राऊत यांचे राज्यपालांना आमंत्रण

‘आम्ही १६२’, या आणि स्वतः बघा; संजय राऊत यांचे राज्यपालांना आमंत्रण

Subscribe

‘आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. आज संध्याकाळी आमचे सर्व १६२ आमदार ग्रँड हयात या हॉटेलवर पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. त्यामुळे या आणि बघा’, असे संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टॅग केले आहे. त्यामुळे राऊत यांनी राज्यपालांना खुल्याने आमंत्रण दिले आहे, हे निश्चित झाले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राजभवनला जाऊन १६२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले. यामध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, राषट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अग्रस्थानी होते. त्यांनी राजभवनला जाऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि राज्यपालांची आज भेट होऊ शकली नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राभवनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्याकडे १६२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. याशिवाय राज्यपाल जेव्हाही सांगतिल तेव्हा या सर्व आमदारांची परेड रजभवनवर करु, असे देखील ते म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -