उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता, दिल्ली-NCRमध्ये स्थिती काय?

उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता, दिल्ली-NCRमध्ये स्थिती काय?

मागील काही दिवसांपासून देशात गर्मीचा पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसात उत्तर आणि पश्चिम भारतात तापमान ३ ते ६ अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकतो. डोंगराळ भागात २८ फेब्रुवारीपासून २ मार्चदरम्यान पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवसांत काही ठिकाणी बर्फवृष्टी होऊ शकते आणि डोंगराळ भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिल्ली-NCRमध्ये स्थिती काय?

दिल्ली-NCRमध्येही तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आज २ अंश सेल्सियसपर्यंत गर्मीचा पारा वाढू शकतो. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजस्थानातील दक्षिण आणि उत्तर प्रदेशात पुढील तीन दिवसांत २ ते ३ अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच दिल्लीत अधिक तापमान ३२ अंश सेल्सियस आणि कमीतकमी ११ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये येत्या २८ फेब्रवारीपासून मार्चदरम्यान हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याव्यतिरिक्त हरियाणा आणि चंडीगढच्या काही भागातं पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु गुजरातमध्ये तापमानाचा पारा मध्यम स्वरुपात राहणार आहे.


हेही वाचा : झारखंडमध्ये बर्ड फ्ल्यूचं थैमान; चार हजार कोंबड्या, बदकांची कत्तल करण्यास सुरुवात


 

First Published on: February 26, 2023 11:22 AM
Exit mobile version