दहा वर्षाच्या साई कवडेने केले युरोपमधील सर्वोच्च शिखर सर

दहा वर्षाच्या साई कवडेने केले युरोपमधील सर्वोच्च शिखर सर

साई कवडे

जगातील सर्वोच्च शिखरांपैकी असलेले युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस सर करून महाराष्ट्रातील सह्याद्रीतील गिर्यारोहकानी इतिहास घडवला आहे. साई कवडे या दहा वर्षीय चिमुकल्याने इतिहास घडवत सर्वात लहान आशियाई पुरुष गटात बाजी मारली आहे. मोहीम सह्याद्रीच्या लेकरांची, असे या मोहिमेचे नाव असून या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले आहे. दहा वर्षाच्या साई कवडे सोबत ही मोहिमेची आखणी केलेली होती.

आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने साईच्या मोहिमेसाठी खुप लोकांनी मदत केली. त्यात मराठा उद्योजक समुहच्या वतीने खुप मोठ सहकार्य मिळाले. त्यांच्याचमुळे ही मोहीम सार्थक झाली. आनंद सरांच्या ३६० एक्स्प्लोरर नेतृत्वाखाली नियोजनबद्ध आखणी केली गेली ठरल्याप्रमाणे सर्वांनी एकमेकांना साथ देत मोहीम यशस्वी केली. मोहिमेसाठी साईचे गुरू अनिल वाघ आणि जेष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाने यांचे मार्गदर्शन मिळाले.  
– सुधीर कवडे, साईचे वडील

रशियामध्ये असलेले युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र तसेच कॅस्पियन समुद्रामध्ये हे शिखर वसलेले आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डर पासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे २५ डिग्री पर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरु असलेली मोठ-मोठी वादळे माउंट अल्ब्रूस चढाईतील मुख्य अडचण आहे. १४ ऑगस्ट च्या मध्यरात्री अंतिम चढाईस या टीमने सुरूवात केली होती. हाडे गोठवणारी थंडी, उणे तापमान या सर्वांना तोंड देत १५ ऑगस्टच्या सकाळी साडेसात वाजता युरोपच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला. तसेच नोव्हेंबर २०१९ मध्ये हीच टीम ऑस्ट्रेलिया येथील सर्वोच्च शिखर सर करणार आहे, असे आनंद बनसोडे यांनी सांगितले.

हेही वाचा –

पूरग्रस्तांसाठी जाणार मुंबईतून मोफत ‘बाप्पा’!

सत्ता मिळाल्यास मोहन भागवतांना २ दिवस तरी तुरुंगात टाकणार – प्रकाश आंबेडकर

First Published on: August 18, 2019 5:36 PM
Exit mobile version