गाझा पट्टीतील इमारतीमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू,अनेक जखमी

गाझा पट्टीतील इमारतीमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू,अनेक जखमी

गाझा पट्टीतील एका निवासी इमारतीमध्ये बुधवारी रात्री भीषण आगीची घटना घडली आहे. या आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये 7 लहान मुलांचा समावेश आहे. या इमारतीत पॅलेस्टाईनचे निर्वासित राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गॅस गळतीमुळे ही आग लागल्याचे समजतेय. (terrible fire in palestine city of gaza 21 people including 7 children died)

एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र प्राथमिक तपासानुसार, इमारतीतील पेट्रोलमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आग वेगाने पसरली. इमारतीत नेमकं पेट्रोल का ठेवले होते याचा तपास सुरु आहे.

 


गाझा पट्टीतील आरोग्य आणि नागरी आपत्कालीन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही आग इतकी भयंकर होती यातून अनेकांना बाहेर पडणे कठीण झाले. यामुळे बहुतांश महिला आणि लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र गंभीर जखमी झालेल्या रुग्णांमुळे मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता आहे. इस्त्रायल सरकारने सांगितले की, गरज भासल्यास ते जखमी निर्वासितांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत करतील.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे एक तास लागला. यावेळी लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु होते. दरम्यान घटनेनंतर बहुतांश लोकांना इमारतीमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी या घटनेला राष्ट्रीय शोकांतिका म्हटले आहे. एक दिवसाचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे.


शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार अडचणीत? आज महत्त्वाची सुनावणी


First Published on: November 18, 2022 10:01 AM
Exit mobile version