पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार, सीआरपीएफचा एक जवान शहीद

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार, सीआरपीएफचा एक जवान शहीद

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान विनोद कुमार एक जवान शहीद झाला आहे. काही महिन्यांपासून काश्मिरी खोऱ्यात दहशतवाद्यांकडून सुरक्षासक्षकांवर गोळीबार केला जात आहे. (terrorists attacked police and crpf personnel in gangue area of pulwama)

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवान नाक्यावर गस्त घालत होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर हल्ला केला. ही घटना गोंगू क्रॉसिंग परिसराती घडली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कॉसिंगजवळच असलेल्या एका सफरचंदाच्या फळबागेच्या झुडपाच्या आत लपून गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान विनोद कुमार जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.

दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी संपूर्ण परिसरात नाकाबंदी दावण्यात आली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवल्यानंतर सुरक्षा दलानेही तातडीने प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू असून यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गोंगू क्रॉसिंगजवळ सर्क्युलर रोडवर रविवारी दुपारी पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांची संयुक्त तुकडी चेकपोस्टवर तैनात होती. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची आणि चालकांची चौकशी केली जात होती. याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला यात एका जवानाचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – वर्तकनगरमधील बेकायदेशीर व अनधिकृत दुकानांवर कारवाई

First Published on: July 17, 2022 6:13 PM
Exit mobile version