थायलंडमध्ये गांजाला मिळणार कायदेशीर मान्यता

थायलंडमध्ये गांजाला मिळणार कायदेशीर मान्यता

प्रातिनिधिक फोटो

थायलंडमध्ये मारिजुआनाला म्हणजे गांजाला आता कायदेशीर मान्यता दिली जाणार आहे. काही क्षेत्रात गांजाचा औषधी म्हणून वापर केला जात असल्याने त्याची परवानगी सरकार देणार आहे. येत्या वर्षात थायलंड मध्ये अधिकृतपणे गांजाची विक्री केली जाणार आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. शरीराला होणारा त्रास घालवण्यासाठी मारिजुआनाचा वापर केला जात असल्याचा मुद्दा थायलंडच्या संसदेत मांडण्यात आला होता. मागील अनेक वर्षांपासून गांजाला अधिकृत दर्जा देण्याची मागणी होत होती. अखेर थायलंड सरकारने लोकांची मागणी मान्यकरून येत्या वर्षापासून गांजा अधिकृत होणार असल्याचे सांगितले.

थाई नागरिकांच्या मागणीचा विचार संसदेत करण्यात येत होता. येत्या काळात गांजाला अधिकृत परवानगी दिली जाणार आहे. हा नियम म्हणजे नागरिकांना नवी वर्षाचे गीफ्ट आहे.”- सोमचई सवांगकर्ण ,संसदीय सत्रात ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन

कॅनडामध्येही उठवलेली बंदी

जगात अनेक ठिकाणी गांजावर बंदी असली तरीही काही देश वेळेनुसार गांजावर असलेली बंदी उठवतात आहे. गांजाचा वापर हा अनेक देशात औषधी म्हणून केला जातो. कॅनडामध्येही गांजाला अधिकृत दर्जा दिला गेला आहे. वैद्यकीय मरिजुआना म्हणजे गांजाला कायदेशीर मान्यता दिली होती. कॅनडातही गांजाचा औषधी तत्वावर वापर केला जातो. उरुग्वे नंतर गांजाला कायदेशीर मान्यता देणारा कॅनडा हा दुसरा सर्वात मोठा देश ठरला. १७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या नियमाची अंमलबजावणी झाली होती. गांजाला कायदेशीर मान्यता मिळताच तेथे गांजाची दुकाने उभारण्यात आली.

First Published on: December 26, 2018 11:26 AM
Exit mobile version