तंबाखू पासून कोरोनाची लस? माकडांवर यशस्वी चाचणी झाल्याचा दावा

तंबाखू पासून कोरोनाची लस? माकडांवर यशस्वी चाचणी झाल्याचा दावा

करोना लस

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  जगभरात या कोरोनाचा कहर वाढत आहे. सध्या २ कोटीहून अधिक रूग्ण जगभरात आहेत. तर ८ लाख ३७ हजार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थिती कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे?  अनेक देशात कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरू आहे. रशिया आणि चीन यांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला असला तरी ही लस किती सुरक्षित आहे, याबाबत अद्याप शाश्वती देण्यात आली नाही आहे. त्यातच आता थायलंडच्या शास्त्रज्ञांनी तंबाखूच्या पानांपासून कोरोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे.

थायलंडच्या चुलालोंगकॉन विद्यापीठाच्या शआस्त्रज्ञांनी जाहीर केले की, स्थानिक पातळीवर निर्माण तयार करण्यात आलेल्या या लसीशी पपिहली चाचणी यशस्वी झाली आहे. या लसीशीची चाचणी माकडांवर करण्यात आली. थाई रेडक्रॉस संसर्गजन्य रोग आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तिरावत हेमाचुडा यांनी सांगितले की, व्हायरसचा डीएनए तंबाखूच्या पानात एकत्रिकरण करून ही लस तयार करण्यात आली आहे. त्या डीएनएला झाडाकडून चांगला प्रतिसाद मिळतो त्यानंतर त्यात प्रथिने तयार होतात, असेही त्यांनी सांगितले.

लशीची ट्रायल माकड आणि उंदरावर करण्यात आली, अद्याप मानवी चाचणी करण्यात आलेली नाही. लवकरच पुढच्या टप्प्यात मानवी चाचणी करण्यात येणार असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले. ही लस तयार करण्यासाठी प्रथिनांचा अर्क काढून घेण्यात येतो.

२०२१ ला कोरोनाच्या दोन लसी बाजारत उलब्ध होतील अस सांगण्यात येत आहे. बर्नस्टेन यांनी एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर फेब्रुवारी-मार्च पर्यंत 4 लशी उपलब्ध होतील. यापैकी दोन लशी ‘एस्ट्राजेनेका व ऑक्सफोर्ड व्हायरल वेक्टर लस आणि नोवावॅक्सची प्रोटीन सब्यूनिट लशीसाठी भारतनं भागीदारी केली आहे. या दोन्ही लशी साधारण 2021 मार्चपर्यंत भारतात उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.


हे ही वाचा – Man Ki Batt : भारतात खेळणी उद्योगाला चालना देणार – पंतप्रधान


First Published on: August 30, 2020 2:11 PM
Exit mobile version