CoronaVirus: कोरोनापासून वाचण्यासाठी नवजात बालकांना फेस मास्क

CoronaVirus: कोरोनापासून वाचण्यासाठी नवजात बालकांना फेस मास्क

CoronaVirus: कोरोनापासून वाचण्यासाठी नवजात बालकांना फेस मास्क

जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव संपूर्ण देशात झाला आहे. त्यामुळे बहुतांश देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना होणाऱ्या नवजात बालकांचा चिंता वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी महिला रुग्णालयात जाण्याऐवजी घरीच नवजात बालकाला जन्म देत आहेत.

कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी सर्व देशातील सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. तसंच आरोग्य क्षेत्रात काम करण्याच्या रक्षणासाठी देखील सरकार उपाययोजना करत आहे. कोरोनाग्रस्त असलेल्या लोकांनासाठी आरोग्य क्षेत्रातील लोक दिवसरात्र काम करत आहेत. एका बाजूला कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असले तरी दुसऱ्या गर्भवती महिलांवर देखील उपचार सुरू आहेत. त्यामुळे नवजात बालकांना जन्म देताना सर्व प्रकारच्या सावधगिरी बाळगल्या जात आहे. दरम्यान थायलंडमधील रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरस होत आहे. थायलंडमधील रुग्णालयात नवजात बालकांचा कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून वाचण्यासाठी लहान आकाराचे फेस शील्ड मास्क तयार केले आहेत.

थायलंडच्या समुत प्राकान प्रोव्हिजन्समध्ये असलेल्या पाओलो रुग्णालयाने आपल्या फेसबुक पेजवर नवजात बालकांना फेस मास्क घातलेले फोटो शेअर केले आहेत. यामध्ये डिलिव्हरी वॉर्डमधील सर्व नवजात बालकांना मास्क घातलेले दिसत आहे. सोशल मीडियावर रुग्णालयातील या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. एका वापरकर्त्याने खूप गोंडस लिहिलं आहे तर दुसऱ्याने नर्स त्यांची कामे अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहेत, असं लिहिलं आहे.


हेही वाचा – CoronaVirus: हॉटस्पॉटचं भयानक वास्तव, साध्या दुधासाठीही तळमळतेय जनता!


 

First Published on: April 9, 2020 7:13 PM
Exit mobile version