घरताज्या घडामोडीCoronaVirus: हॉटस्पॉटचं भयानक वास्तव, साध्या दुधासाठीही तळमळतेय जनता!

CoronaVirus: हॉटस्पॉटचं भयानक वास्तव, साध्या दुधासाठीही तळमळतेय जनता!

Subscribe

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने १५ जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट्स घोषित करून त्या भागांना सील केलं आहे. या १५ जिल्ह्यांच्या यादीत नोएडाचा देखील समावेश आहे. नोएडातील ज्या हॉटस्पॉट भागात सील केलं आहे. त्या भागातील लोकांना सर्व समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही भागात लोक दुधासाठी तळमळत आहेत. तसंच कार्यरत असलेल्या डॉक्टरांना देखील येथील भागात जाण्यास परवानगी देत नाही आहेत. कोरोना विषाणू संसर्गासाठी घराघरात सर्वे करणाऱ्या अंगणवाडीच्या सेविका देखील यामुळे रडल्या असल्याचं समोर येत आहे.

ग्रेटर नोएडा आणि ग्रेनो वेस्टमधील काही भागातील दुधाच्या पुरवाठ्यावर बंदी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पंचशील, अजनारा, गौर शहर १ आदि हॉटस्पॉटमधील समाविष्ट नाही आहे, परंतु ऑनलाईन दूध न मिळल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी सर्व दुकाने बंद केली आहे. सोसायटी मधील दूध केंद्रावर लाइन लागली आहे. रेशन दुकानदेखील बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे इथले लोक त्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

वरुण विहार एन्क्लेव्ह सेक्टर २८ हॉटस्पॉटमुळे सील करण्यात आलं आहे. डॉ. संचिता दुबेने सांगितलं की, ती नोएडाच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. तिला रुग्णांच्या उपचारासाठी जायचं होतं, मात्र आरडब्ल्यूएने तिला जाऊन दिलं नाही. जेव्हा ती मुख्य गेटजवळ पोहोचली तेव्हा तिथे टाळा लावला होता. त्यावेळेस तिने गार्डला टाळा खोलण्यास सांगितला तेव्हा त्याने चावी नसल्याचं सांगितलं. पोलिसांना टाळा लावल्यामुळे ते आपल्यासोबत चावी घेऊन गेले आहेत. त्यानंतर डॉ. संचिताने हेल्पलाईन ११२ नंबरवर कॉल लावला मात्र तो कोणीचं उचलला नाही.

- Advertisement -

यादरम्यान अंगणवाडी सेविकांनाही अडचणीचा सामना करावा लागला. आरोग्य विभागाने घरघरात सर्वे करण्याचे काम दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना सेक्टर ५ मधील हरोला गावामध्ये हेल्थ सर्वेसाठी जायचे होते. मात्र त्यांना जाऊ दिले नाही. प्रशासनाने तो भाग सील केला आहे. यामुळे आमच्या सर्वेक्षणावर परिणाम होत असल्याचं अंगणवाडी सेविकांनी सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त नोएडामध्ये आढळले आहे. आतापर्यंत ६० कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.


हेही वाचा – Corona Heroes: कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी ‘हा’ डॉक्टर राहतोय गाडीत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -