पंतप्रधान पुन्हा चर्चेत, आधी केळं फेकलं आता पत्रकारांवर सॅनिटायझर शिंपडल

पंतप्रधान पुन्हा चर्चेत, आधी केळं फेकलं आता पत्रकारांवर सॅनिटायझर शिंपडल

पंतप्रधान पुन्हा चर्चेत, आधी केळं फेकलं आता पत्रकारांवर सॅनिटायझर शिंपडल

थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा आपल्या विक्षिप्त वागणुकीमुळे कायम चर्चेत असतात. सध्या सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. यात ओचा पत्रकारांवर चक्क सॅनिटीयझर शिंपडत असल्याचं दिसतयं. यामुळे ओचा यांच्यावर जगभरात टीकेची झोड उठली आहे. ओचा हे दर आठवड्याला पत्रकार परिषद घेतात. या कार्यक्रमात संबोधित करताना ओचा यांना एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्या प्रश्नावर चिडून ओचा यांनी पत्रकारांवर सॅनिटायझरच शिंपडलं. त्यांच्या अशा वागण्यावरुन राजकिय वर्तुळातही अनेक चर्चा सुरु आहेत.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, प्रयुत चान ओचा हे साप्ताहिक पत्रकार परिषदेत ओचा यांच्या मंत्रीमंडळात झालेल्या संभाव्य बदलाविषयी प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांनंतर ओचा हे प्रचंड चिडले. पत्रकारांनी आपल्या कामाशी काम ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी समोर असलेली सॅनिटायझर बॉटल उचलली आणि पत्रकारांच्या अंगावर शिंपडायला सुरुवात केली. ओचा यांच्या या विक्षिप्त वागण्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. या आधीही त्यांनी पत्रकारांच्या अंगावर केळ्याचे साल फेकले होते.

थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा हे थायलंडच्या पूर्व सैनिक कमांडर होते. त्यानंतर २०१४ साली ते थायलंडमध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक आलेली सत्ता बरखास्त केली आणि त्यांनी आपली सत्त स्थापन केली. या आधीही थायलंडचे पंतप्रधान ओचा यांनी अनेक कार्यक्रमाच्या वेळी अशाप्रकारचे वर्तन केले आहे. या आधी अशाच एका पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी कॅमेरामनच्या अंगावर केळ्याचे साल फेकले. २०१८मध्येही ओचा एका कार्यक्रमात पत्रकारांना नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी पत्रकारांशी बोलणेही टाळले होते. त्यांच्या अशा वागण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ओचा यांच्या अशा विचित्र वागण्या त्यामुळेच पत्रकारही त्यांच्या पत्रकार परिषदेला जाणे टाळत असतात.


हेही वाचा – विमान अपघातग्रस्त पायलट ५ आठवडे पक्षांची अंडी खाऊन जगला आणि…
First Published on: March 10, 2021 4:28 PM
Exit mobile version