घरदेश-विदेशविमान अपघातग्रस्त पायलट ५ आठवडे पक्षांची अंडी खाऊन जगला आणि...

विमान अपघातग्रस्त पायलट ५ आठवडे पक्षांची अंडी खाऊन जगला आणि…

Subscribe

वयवर्ष ३६ असणारा एक पायलट अॅमेझॉनच्या निर्जन जंगलात फसल्यानंतर अखेर तो आपल्या घरी सुखरूप पोहोचला आहे. या पायलटचे नाव Antonio Sena असे असून हा व्यक्ती गेल्या ५ आठवड्यांपासून जंगलात राहत होता. या ५ आठवड्यादरम्यान तो त्याचं पोट भरण्यासाठी जंगलात असणाऱ्या पक्ष्यांची अंडी आणि जंगली फळभाज्या खाऊन त्याचं पोट भरत होता. अँटोनियो हा गेल्या २८ जानेवारीपासून बेपत्ता असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. हा पायलट पोर्तुगालच्या एलेंकेर शहरातून एलमेरिअम शहरात जात होता. मात्र या उड्डाणादरम्यान विमानात यांत्रिक अडचणी येत असल्याते लक्षात येताच पायलटने अॅमेझॉनच्या जंगलात विमान लँड करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यापूर्वीच विमानाला आग लागली, ही घटना घडण्याच्या काही मिनिटांआधी त्याने एका बॅगेत ब्रेड आणि इतर वस्तू काढून ठेवल्या होत्या.

पायलट अँटोनियो विमान अपघातातून बचावला, परंतु अ‍ॅमेझॉनच्या निर्जन जंगलांमध्ये त्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याने त्याचा पहिला आठवडा विमानाजवळ घालवला. अँटोनियो बेपत्ता झाल्याचे समजताच रेस्क्यू टीम सक्रिय झाली. यावेळी, त्याने पक्ष्यांची अंडी आणि जंगलातील फळांच्या मदतीने आपली भूक भागविण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

आपल्या विमानाजवळ अँटोनियो काही दिवस राहिला मात्र तो निर्जन जंगलात सतत कोणाची न कोणाची मदत मिळण्यासाठी कासावीस झाला होता. सुदैव म्हणजे त्याच्या मदतीस त्वरीत रेस्क्यू टीम आली. या टीममधील काही लोक त्याला भेटताच तो अधिक भावनिक झाला. या दिवसात ३६ वर्षीय पाटलटचे वजन देखील कमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. अँटोनियो एका महिन्यापेक्षा अधिक काळ जंगली जनावरं असणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलात जीव मुठीत घेऊन राहत होता. जंगलात त्याला काही किरकोळ जखमादेखील झाल्या होत्या, त्यावरील उपचारांसह डिहायड्रेशनवर उपचार करून डॉक्टरांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. या सगळ्या कठिण परिस्थितीत तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आतुर झाला होता. कुटुंबियांच्या प्रेमामुळे तो सुखरूप घरी पोहोचला असल्याचेही त्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -