हा तर सगळा कांगावाच?

हा तर सगळा कांगावाच?

तन्वी शेठ आणि अनास सिद्दीकी (सौजन्य- फेसबुक)

लखनऊमधील पासपोर्ट प्रकरण काही थांबायचे नावच घेत नाही. रोज नवे खुलासे या प्रकरणात होत असताना आता या प्रकरणाला वळण देणारा आणखी एक मुद्दा समोर आला आहे. ‘त्या दिवशी असं काहीच झालं नव्हतं’,असे सांगणारा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर हा तर सगळा कांगावाच! अशी प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान प्रत्यक्षदर्शीने त्या दिवशी असे काहीच झाले नसल्याचा दावा केला असला तरी आम्ही याची सत्यता पडताळलेली नाही. या नव्या व्हिडिओनंतर तन्वी सेठ आणि अनास सिद्दीकी वादाच्या भोवऱ्यात मात्र सापडण्याची शक्यता आहे.

काय म्हणाला प्रत्यक्षदर्शी ?

तन्वी सेठ आणि अनास सिद्दीकी पासपोर्ट काढायला लखनऊच्या पासपोर्ट सेंटरवर गेल्यानंतर त्यांना धर्म परिवर्तन करुन पासपोर्ट घ्या, असा अजब सल्ला दिल्याचे त्यांनी सोशल मीडियावरुन सांगितले. त्यानंतर हे प्रकरण प्रसारमाध्यमांसमोर आले. पण तन्वी सेठ आणि अनास यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी येथे घडल्या नाहीत, असा खुलासा करणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्यादिवशी प्रत्यक्षदर्शीने तन्वीने सांगितल्याप्रमाणे काहीच झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे तन्वी आणि अनासने केलेले आरोप खोटे असल्याचे या प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. बघा काय म्हणतोय, हा प्रत्यक्षदर्शी

प्रकरण काय?

दिल्लीतील नोएडा भागात राहणाऱ्या तन्वी शेठ यांना नवा पासपोर्ट काढायचा होता. तर त्यांचे पती अनास यांना पासपोर्टचे नुतनीकरण करायचे होते. लखनऊच्या पासपोर्ट कार्यालयात गेल्यानंतर  ‘मुस्लिम माणसाशी विवाह केल्यामुळे धर्म बदलल्याशिवाय पासपोर्ट मिळणार नाही’ असे सांगण्यात आले..यावर विरोध करताच अनास यांना बोलावून त्यांची फाईल घेऊन, ‘तुम्ही तुमचा धर्म बदला, गायत्री मंत्र म्हणा आणि फेरे घ्या’ असे सांगण्यात आल्याची माहिती अनास यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शिवाय मिश्रा यांनी हे सांगताना उदधटपणा केल्याचे देखील अनास यांनीच सांगितले. पण असे काही झाले नसल्याचे अधिकारी मिश्रा यांनी सांगून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.

वाचा- आता पासपोर्ट प्रकरणाला वेगळेच वळण

First Published on: June 24, 2018 12:50 PM
Exit mobile version