दंडाची रक्कम मुख्यमंत्र्यांच्या पगारातून कापा

दंडाची रक्कम मुख्यमंत्र्यांच्या पगारातून कापा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (फोटो सौजन्य-नवभारत टाइम्स)

दिल्लीतील हावामान सध्या प्रदुषीत असून आता त्याचा त्रास मंत्र्यांना होणार आहे. दिल्लीत प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सरकारने करावे असे हरित लवादाद्वारे सांगण्यात आले आहे. दिल्ली सरकारवर २५ कोटींचा दंड ठोठावण्याचीही मागणी करण्यात आली. याच बरोबर भाजपने सांगितले आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री आरोप प्रत्यारोप न करता हवामान सुधरवण्यावर भर द्यावी. हवेचा स्तर खाली उतरत चालला आहे. हवेचा स्तर योग्य ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने प्रयत्न करावा असे म्हटलं आहे. सरकारवर दंड बसवून ही दंडाची रक्कम मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या पगारातून कापण्याची मागणीही भाजपने केली आहे.

मनोज तिवरींनीही केलेत आरोप

दिल्ली भाजप अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रदूषणाच्या मुद्यावर धारेवर धरले आहे. प्रदुषणाला खांबवण्यासाठी दिल्ली सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. दिल्ली सरकार प्रदूषणाच्या मुद्यापासून लांब पळते आहे. मंत्र्याच्या पगारातून पैसे कापल्या गेले की मग पर्यावरणाच्या सरक्षणासाठी सकार पाऊले उचलतील.

यापूर्वीही लावले होते आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. नुकतेच त्यांनी मोदींविरोधात एक गाणे ट्विट केले होते. तसेच भाजप दिल्लीचे क्षत्रू असल्याचे ते म्हणाले होते. दंगल प्रकरणी आरोपातून मुक्तता झाली असली तरीही दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली होती. गृहमंत्रालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ला चौकशीचे आदेश दिले असल्याने केजरीवाल यांनी मोदींविरोधात ट्विट केले होते. सीबीआयने २४ ऑगस्ट २०१७ रोजी ही तक्रार नोंदवली होती. संत्येद्र जैन यांच्या मालकीच्या सहा जागांवर सीबीआयने धाडी टाकल्या होत्या याच बरोबर मनी लॉडरिंगच्या प्रकरणीही त्यांची चौकशी सुरु करण्यात आली. म्हणून भाजप आपल्या मंत्र्यांशी बदला घेत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.

First Published on: December 4, 2018 2:34 PM
Exit mobile version