घरदेश-विदेशकेजरीवाल यांच्यावर झालेला हल्ला खोटा- मनोज तिवारी

केजरीवाल यांच्यावर झालेला हल्ला खोटा- मनोज तिवारी

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेला मिर्ची हल्ला हा खोटा आहे. आप पक्षाकडून हा हल्ला करवण्यात आला असल्याचा आरोप दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ड्रामेबाज असून त्यांच्यावर झालेला हल्ला हा खोटा असल्याचा आरोप भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये लोकांची सहानुभूति मिळावी यासाठी आम आदमी पक्षानेच हा हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप त्यांनी केला. हल्ला करून भाजप पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केरजीवाल करत असल्याचे सांगितले. केजरीवाल यांच्यावर काही दिवसांपूर्वी मिर्ची पावडर फेकण्यात आली होती. यानंतर  केजरीवाल यांनी पत्रकार परिषदचे आयोजन केले. आपल्या मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली. दरम्यान या प्रकरणी अनिल कुमार शर्मा यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काय म्हणाले केजरीवाल

माझ्यावर दोन वर्षात चार हल्ले झाले आहेत. एका मुख्यमंत्र्यावर असे हल्ले होणे ही साधी बाब नाही. हे हल्ले नागरिकांकडून होत नाही ते घडवले जातात. माझ्यावर हल्ले करण्याचे आदेश दिले जात आहेत. आम्ही त्यांच्यासाठी अडथळा ठरत आहोत. त्यामुळे हे सर्व मिळून माझ्या जीवावर उठले आहेत.- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

- Advertisement -

काय आहे नेमका प्रकार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली सचिवालयात आपल्या कार्यालयात आले होते. ते एक बैठक घेऊन बाहेर निघाले होते. एक अज्ञात तरुण सचिवालयाच्या बाहेर उभा होता. त्याने माचिसच्या डबीत मिरचीपूड आणली होती. केजरीवाल समोर येताच तरुणाने केजरीवाल यांच्या अंगावर मिरचीपूड टाकली. यादरम्यान, धक्काबुक्की सुद्धा झाली. या धक्काबुक्कीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला. सुदैवान केजरीवाल यांना मोठी इजा झाली नाही. पोलिसांनी केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचे नाव अनिल कुमार शर्मा असे आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -