CBSEचा १२वी निकाल जाहीर; विद्यार्थी ‘या’ वेबसाईटवर पाहू शकतात निकाल

CBSEचा १२वी निकाल जाहीर; विद्यार्थी ‘या’ वेबसाईटवर पाहू शकतात निकाल

मुंबई | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईने (CBSE) कोणतीही पूर्व सूचना न देता आज निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी (Students) परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.gov.in आणि cbseresults.nic.in  अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल.

यंदाच्या वर्षात बारावीमध्ये ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सीबीएसईच्या निकालात पुन्हा एकाद मुलींनी बाजी मारली आहे. सीबीएसईमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ६ टक्के अधिक आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत ९०.६८ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.६९ टक्के ऐवढी आहे.

 

First Published on: May 12, 2023 11:25 AM
Exit mobile version