Coronavirus Updates: देशात 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 155 नवीन रुग्ण, तर संसर्ग दर 5.63 टक्के

Coronavirus Updates: देशात 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 155 नवीन रुग्ण, तर संसर्ग दर 5.63 टक्के

मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात 24 तासांत 6 हजार 155 इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर संसर्ग दर 5.63 टक्क्यांवर वर गेला आहे. या प्रकरणासह देशात सक्रिय रुग्णांची संख्या 31 हजार 194 इतकी झाली आहे. त्याचप्रकारे देशात 4 कोटी 47 लाख 51 हजार 2.59 लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. येत्या 24 तासांत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनामुळे मृतांचा आकडा 5,30,954 वर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19चा रिकव्हरी रेट 98.74 टक्के आहे. तर सक्रिय दर 5.63 टक्के आणि साप्ताहिक सक्रिय दर 3.47 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. यावेळी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,89,111 इतकी आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवण्यात आले आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

केंद्राचे राज्यांना रुग्णालयात मॉक ड्रिल, टेस्टिंग वाढवण्याचे आदेश

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काल शुक्रवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. मांडविया यांनी आरोग्य मंत्र्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व रुग्णालयांचा दौरा करुन मॉक ड्रिल आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, देशातील सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यातील आपातकालिन स्थिती आणि कोरोना हॉटस्पॉटची माहिती घेण्यास सांगितली आहे. त्यासोबतच टेस्टिंग, जिनोम सिक्वेंन्सिग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. हॉस्पिटल्समध्ये मुलभूत सुविधा आहेत की नाही याची माहिती घेऊन त्या अधिक सक्षम करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाशी संबंधीत नियमांचे सक्तीने पालन करण्यास सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : COVID 19 : रुग्णवाढीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; केंद्राचे राज्यांना रुग्णालयात मॉक ड्रिल, टेस्टिंग वाढवण्याचे आदेश


 

First Published on: April 8, 2023 12:36 PM
Exit mobile version