Corona Effect : डिस्ने थीम पार्कमधील २८ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

Corona Effect : डिस्ने थीम पार्कमधील २८ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

बच्चे कंपनीसह मोठ्यांचेही आवडते आणि एकदा तरी भेट देण्याची इच्छा असलेले फेव्हरिट ठिकाण म्हणजे डिस्ने वर्ल्ड. जगातील या लोकप्रिय ठिकाणावर जाण्याची सर्वाचीच इच्छा असते. मात्र कोरोनाच्या संकटकाळात डिस्नेदेखील बंद ठेवण्यात आले होते. आतातरी येथील कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णयच कंपनीने घेतला आहे. कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढली असल्याने डिस्ने कंपनीने आपल्या थीम पार्कमध्ये काम करणाऱ्या तब्बल २८ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरवले आहे. कोरोनामुळे दीर्घकालीन परिणामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बहुतेक थीम पार्कमधील कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल, असे कंपनीने काल, मंगळवारी जाहीर केले.

डिस्ने आपल्या थीम पार्कमधील जवळपास २८ हजार किंवा कर्मचाऱ्यांपैकी एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल, असे कंपनीने म्हटेल आहे. याबाबत बोलताना डिस्नेचे अध्यक्ष जोश डी आमारो म्हणाले की, हा निर्णय अत्यंत वेदनादायक आहे. पण कोविड १९ मुळे व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. तसेच, सामाजिक अंतर नियमांची मर्यादा, कमीतकमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि दीर्घकाळापर्यंत असणारा कोरोना साथीचा रोग यांसारख्या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये कर्मचाऱ्यांची कपात हाच एकमेव पर्याय आहे.

कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामधील डिस्नेच्या थीम पार्कमध्ये कोरोना येण्यापूर्वी १ लाख १० हजार कर्मचारी कार्यरत होते. आता नव्या धोरणांत कपातीची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या ८२ हजारांच्या जवळपास होण्याची शक्यता आहे. सध्या कॅलिफोर्नियात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे जोश डी आमारो यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा –

Babri Masjid Verdict Live : बाबरी मशिद प्रकरणाच्या निकालाचं वाचन थोड्याच वेळात होणार सुरू!

First Published on: September 30, 2020 11:28 AM
Exit mobile version